Nashik : महापालिका हद्दीत हवीत ई-कचरा संकलन केंद्रे

 e waste
e waste esakal

नाशिक : सद्यस्थितीत नाशिकमध्ये ई-कचऱ्याचे (E Waste) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत सर्वसामान्य नागरिक अनभिज्ञ आहेत. यामुळे ई-कचऱ्याचा धोका वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ई-कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी (E waste management) नाशिक महापालिकेने (NMC) पुढाकार घेत सहाही विभागांत ई-कचरा संकलन केंद्रे सुरू केल्यास भविष्यातील ई-कचऱ्याचा धोका टाळणे शक्य होणार आहे. (Need e waste collection centers within NMC limits Nashik News)

कोरोना काळात मोबाईल, टॅब, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांचा वापर वाढला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला, तरी नागरिकांना ऑनलाइनची लागलेली सवय काही कमी झालेली नाही. परिणामी, ई साहित्याची विक्रीही वाढली आहे. मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी शहरातील महात्मा गांधी रोडवर मोठे मार्केट उभे राहिले आहे. या भागात नवीन मोबाईल, टॅब विक्री, दुरुस्ती व स्पेअर पार्टची बरीच दुकाने आहेत. या भागात टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप, कॉम्प्युटर विक्री व दुरुस्तीचीही दुकाने आहेत. एप्रिल महिन्यात महात्मा गांधी रोडवरील या बाजार पेठेसमोरील मोकळ्या भूखंडावर टाकल्या जाणाऱ्या दुरुस्तीनंतर निकामी मोबाईल व त्यांचे साहित्य, बॅटरी आदी ई-कचऱ्याने अचानक पेट घेतला होता.

अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली होती. सुदैवाने जीवितहानी व मोठा अनर्थही टळला होता. अनेक नागरिकांच्या घरांमध्येही ई कचऱ्याने जागा व्यापली आहे. मोठ्या दुर्घटना आणि ई कचऱ्याच्या रूपाने समोर उभा ठाकलेला धोका टाळायचा असल्यास ई कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या घंटागाड्या प्रत्येक विभागात कचरा संकलन करतात. अगदी त्यानुसारच नाशिक महापालिकेने पंचवटीसह नाशिक रोड, सिडको, सातपूर, पूर्व आणि पश्चिम या सहाही विभागांमध्ये ई कचरा संकलन केंद्रे सुरू करणे काळाची गरज आहे. ही केंद्रे सुरू झाल्यास नागरिकांना ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे होईल आणि भविष्यातील ई कचऱ्याचा धोका टाळणे शक्य होईल.

 e waste
सीपेट प्रकल्पाला भुजबळांकडून खोडा; खासदार हेमंत गोडसे यांचा आरोप

जनजागृतीची गरज

महापालिकेने ई कचरा संकलन केंद्रांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो, त्याप्रमाणेच ई कचराही वेगवेगळा केला जातो. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ई कचरा संकलन केंद्रांसाठी पावले उचलण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 e waste
बंडखोरांना जिवंतपणी दाखवले अमरधाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com