Nashik News : मोसम पुल चौकातील बसथांब्यावर प्रवासीशेडची गरज! प्रवासांसह ज्येष्ठांची गैरसोय

मालेगाव येथे नाशिक, सटाणा व नामपूर या तीन मार्गांवर जाणाऱ्या बसेससाठी मोसमपूल चौकात तीनही वेगवेगळ्या रस्त्यांवर बस वाहन थांबे आहेत.
Crowd of passengers waiting for the bus and women passengers sitting on the road at the bus stop in front of the Cantonment Police Station in Malegaon.
Crowd of passengers waiting for the bus and women passengers sitting on the road at the bus stop in front of the Cantonment Police Station in Malegaon.esakal

मालेगाव : येथे नाशिक, सटाणा व नामपूर या तीन मार्गांवर जाणाऱ्या बसेससाठी मोसमपूल चौकात तीनही वेगवेगळ्या रस्त्यांवर बस वाहन थांबे आहेत.

यातच महिला व वृध्द प्रवासी मोठ्या संख्येने असल्याने त्यांना बसची प्रतिक्षा करत तास-अर्धा तास वाहन थांब्यांवर उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांसाठी या बस थांब्यांवर प्रवासी शेड करणे गरजेचे आहे. (need for passenger shed at the bus stand in Mosam Pul Chowk Inconvenience of seniors with travel Nashik News)

शहरात राज्य परिवहन महामंडळाचे नवीन व जुने बसस्थानक असे दोन बसस्थानक आहेत. महिलांना प्रवासात ५० टक्के सुट व ७५ वर्षापुढील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत दिल्यानंतर परिवहन महामंडळाला सुगीचे दिवस आले आहेत.

बसमधील महिला व वृध्द प्रवाशांची संख्या विक्रमी वाढली आहे. जुन्या महामार्गाने नाशिक, मनमाडकडे जाणाऱ्या बससाठी मोसम पुल चौकातील पेट्रोल पंपासमोर तसेच निसर्ग चौक व मोतीबाग नाका येथे वाहन थांबा आहे.

येथेच रिक्षा थांबा देखील आहे. रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा उभ्या करतात. त्याशेजारी प्रवासी उभे राहतात. यामुळे जुना महामार्ग चौपदरीकरण होऊनही मोसम पुल चौकात तो फक्त दुहेरी असतो. वर्दळीचा व प्रमुख चौक असल्याने येथे बस येऊन थांबल्यानंतर प्रवासी बसेपर्यंत बसच्या पाठीमागे रस्त्यावर अन्य वाहनांच्या रांगा लागतात.

खासदार सुभाष भामरे यांच्या निधीतून काही वर्षापूर्वी येथे शेड करण्यात आले होते. अतिक्रमण हटाव व रस्ता दुरुस्तीच्या मोहिमेत ते शेड काढण्यात आले. त्यानंतर येथे शेडच झाले नाही. नामपूर साक्रीकडे जाणाऱ्या बसेससाठी छावणी पोलिस ठाण्यासमोर बस थांबा आहे.

येथेही अशीच स्थिती असते. त्यातच येथे प्रभाग कार्यालय, पोलिस ठाण्यातील गर्दी व रिक्षा थांबा यामुळे कोंडीत भर पडते. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर रुंदीकरण झालेल्या रस्त्यावर अतिक्रमण धारकांनी, फेरीवाल्यांनी तसेच पार्किंगवाल्यांनी कब्जा केला आहे.

Crowd of passengers waiting for the bus and women passengers sitting on the road at the bus stop in front of the Cantonment Police Station in Malegaon.
Nashik News : नांदूरमध्यमेश्वर पाणथळ क्षेत्राचे आरोग्य धोक्यात! पाणवेलीचा प्रश्न गंभीर

व्यावसायिक दुकाने, व्यापारी संकुलांसमोर पार्किंगची सोय नसल्याने ग्राहक रस्त्यांचाच आधार घेतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला प्रवासी शेड झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल.

सटाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही मराठी शाळेसमोर अथवा छत्रपती संभाजी महाराज चौकात प्रवासी शेड करावेत. शेड नसल्याने वृध्द व महिलांची मोठी गैरसोय होते. अनेकांना बसच्या प्रतिक्षेत रस्त्यावरच पथारी मारावी लागते.

सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वानवा

शहरातील सर्वात वर्दळीचा चौक म्हणून मोसम पूल चौकाची गणना होते. येथे बस व खासगी प्रवासी मोठ्या संख्येने असतात. या चौकात स्वच्छतागृहच नसल्याने मोठी कुचंबणा होते. काही वर्षापूर्वी जुन्या मोसम पुलाखाली व मराठी शाळेजवळ स्वच्छतागृह करण्यात आले होते.

पुलाचे नवीन बांधकाम व मोसम पुल शाळेच्या आवारात महात्मा फुले अभ्यासिका होत असल्याने हे दोन्ही स्वच्छतागृह तोडण्यात आली. येथे जागेचा शोध घेऊन सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.

Crowd of passengers waiting for the bus and women passengers sitting on the road at the bus stop in front of the Cantonment Police Station in Malegaon.
Nashik News : गोदाकाठ भागात विजेचा लपंडाव! महावितरण कंपनीचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com