नाशिक- वैद्यकीय शाखेतील पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची बहुप्रतिक्षित प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘नीट’ परीक्षा दिलेल्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी बुधवार (ता. ३०)पर्यंत मुदत आहे. दरम्यान, एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाची पहिली निवड यादी ७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. आयुष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक स्वतंत्ररीत्या जाहीर केले जाईल.