Nashik NEP discussion
sakal
नाशिक: तिसरीपर्यंत मराठी, इंग्रजी सक्तीचे असले तरी चालेल; परंतु तृतीय भाषा तोंडी स्वरूपात ऐच्छिक असावी. त्याचे मूल्यमापन, परीक्षा होऊ नये. हिंदीपेक्षा विविध प्रादेशिक बोलीभाषा निवडण्याचा पर्याय विद्यार्थी व पालकांना द्यावा, असा सूर मंगळवारी (ता. ११) विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या चर्चेतून उमटला. काहींनी पहिलीपासून, तर काहींनी शैक्षणिक धोरणाच्या स्तररचनेनुसार सहावीपासून हिंदी सक्तीचे समर्थन केले. काहींनी परदेशी भाषांचा अंतर्भाव करण्याचा सल्ला दिला.