आरोग्य कर्मचाऱ्याची प्रसूत महिलेला मारहाण; बाळाचा मृत्यू | Nashik

new born baby death
new born baby deathesakal

नाशिक : जिल्हा रुग्णालयात (district hospital) आरोग्य कर्मचाऱ्याने प्रसूत महिलेला मारहाण केल्याने तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. ११) संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यावरील कारवाईच्या मागणीसाठी तब्बल आठ तास बाळाचा मृतदेह तसाच पडून होता. यानिमित्ताने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा मुद्दा पुढे आला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा मुद्दा पुढे, काय घडले नेमके?

हिरा कैलास गारे (पेठ, जि. नाशिक) असे पीडित मातेचे नाव आहे. मंगळवारी (ता. ९) पेठ येथून पहाटे चारला या महिला प्रसूतीसाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात आली होती. पहाटे पोटात कळा सुरू झाल्यानंतर ती बाथरूममध्ये जात असताना तेथील सफाई कर्मचाऱ्याने तिला अडवत शिवीगाळ करीत गालात मारून धक्का देत भिंतीवर लोटले. पोटावर मार लागल्याने पोटातील बाळाला धक्का लागला. सकाळी तिची प्रसूती झाली. या वेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. ज्युनिअर कर्मचाऱ्याने प्रसूती केली. पुरेसा अनुभव नसल्याने बाळ त्यांच्या हातातून निसटून खाली पडले. त्यात बाळाच्या डोक्याला मार लागून त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला एनआयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. गुरुवारी उपचार सुरू असताना बाळाचा मृत्यू झाला असा पीडित महिलेचा व तिच्या कुटुंबाचा आरोप आहे. पीडित मातेच्या कुटुंबाने या संदर्भात बुधवारी (ता. १०) जिल्हा शल्यचिकित्सक तसेच पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

चौकशीचे आदेश

दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबाने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे चौकशीची मागणी केली आहे. तसेच चौकशीविना मृत बाळाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा गुरुवारी सकाळी इशारा दिला. प्रसूती झाली त्या वेळी प्रशासनाकडून लक्ष दिले नाही. डॉक्टर नव्हते. कर्मचाऱ्याने ढकलल्याने महिला खाली पडून बाळ खाली पडले. त्यात बाळाच्या डोक्याला मार लागला आहे, त्यामुळे बाळाला काचेत ठेवले, असाही आरोप केला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

new born baby death
ST Strike | संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारचा 'मास्टरप्लॅन'?

तब्बल आठ तास बाळाचा मृतदेह तसाच पडून

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील सफाई कामगार व वैद्यकीय अधिकारी यांच्यामुळे बाळाचा मृत्यू झाला आहे. आठ तासांपासून बाळाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये पडून होता. दोषींवर कारवाई करीत नाही, तोपर्यंत बाळाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पालक व नातेवाइकांनी घेतली आहे. बाळाच्या आईने सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दिली. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर बाळाचा मृतदेह पुढील सोपस्कारांसाठी ताब्यात घेतला.

new born baby death
भारतीय कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; लँसेंटचा रिपोर्ट

प्रसूतीदरम्यान बाळ जोरात खाली पडले आणि त्याच्या डोक्याला जोरात मार लागला. मातेला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. ग्रामीण भागातील आदिवासी गरीब, कष्टकरी रुग्णांनी नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी यावे की नाही, असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली आहे. -हिरा कैलास गारे, पीडित, पेठ, जि. नाशिक

संबंधित प्रकारात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन दिवसांत चौकशीचा अहवाल येईल. चौकशी अहवाल आल्यानंतर त्याविषयी कारवाई केली जाईल. -डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

संबंधितांवर कारवाई करा : श्रमजीवी संघटना

वाडीवऱ्हे : प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल महिलेस अमानुष मारहाण केल्याने बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्यावर व बाळंतपणावेळी गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर करवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे नाशिक तालुकाध्यक्ष अर्जुन भोई, कैलास गारे, अरुण चौधरी, प्रदीप माळेकर, किसन देशमुख यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com