NMC News : पेस्ट कंट्रोलच्या वादग्रस्त ठेकेदाराला मुदतवाढीचा नवा विक्रम!

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला पुन्हा नव्याने मुदतवाढ दिली जात आहे. साडेतीन वर्षात तब्बल सातवी मुदतवाढ ठरणार आहे.

मुदतवाढ देण्याच्या जीवशास्त्रज्ञ विभागाच्या या नव्या विक्रमामुळे केंद्र सरकारच्या सीव्हीसी गाईडलाईनचे उल्लंघन झाले आहे. (new record of extension for controversial pest control contractor NMC nashik news)

शहरात धूर औषध फवारणीसाठी दरवर्षी ठेका दिला जातो. मात्र, मे दिग्विजय एंटरप्राइजेस या वादग्रस्त ठेकेदाराला सातत्याने दर सहा महिन्यांनी मुदतवाढ दिली जात असल्याने नवा विक्रम निर्माण झाला आहे. साडेतीन वर्षांपासून या ठेकेदाराकडे पेस्ट कंट्रोलचे काम आहे.

दिग्विजय एंटरप्राइजेस पेस्ट कंट्रोलची मुदत सात ऑगस्ट २०१९ ला संपुष्टात आली. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया राबविणे अपेक्षित होते. नव्याने निविदा राबवण्यासाठी प्रस्तावदेखील तयार झाला, मात्र सदरचा प्रस्ताव हा दिग्विजय एंटरप्राइजेससाठीच तयार केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

जो ठेका २०१९ मध्ये १९ कोटी रुपयांना दिला गेला, तोच ठेका २०२० मध्ये तब्बल ४६ कोटींवर पोचवला. परंतु प्रस्तावात संशय आल्याने तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रस्तावातील काही मुद्दे वगळल्यानंतर फेरनिविदा काढली, मात्र सदर फेरनिविदा दिग्विजय एंटरप्राइजेस ठेकेदारांच्या पचनी पडली नाही.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

NMC Nashik News
Consumer Court : मेडिक्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका!

त्यामुळे सत्तावीस ऑक्टोबर २०२२ ला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यानंतर कैलास जाधव यांच्या जागी बदलून आलेले आयुक्त रमेश पवार यांनी त्याच्यातील अनावश्यक खर्चाला कात्री लावत ४६ कोटी रुपयांवरून ते तीस कोटी रुपयांवर सुधारित प्रस्ताव आणून निविदा काढली.

दरम्यान, अद्यापही निविदा उघडण्यात आलेली नाही यादरम्यान दिग्विजय एंटरप्राइजेसला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. दिग्विजय एंटरप्राइजेस सातत्याने मुदतवाढ घेऊन विनानिविदा काम करून स्वतःचा विक्रम प्रस्थापित करताना आता निविदा निघाली तरी त्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी भाजप व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले जात असल्याची चर्चा आहे.

NMC Nashik News
Nashik News : अजबच आहे सारं...‘निर्भया’ पोलीसांना वडापाव खाऊ द्या अन् वाहतूक कोंडी होऊ द्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com