esakal | नांदगावला मोजक्याच लसी…लांबलचक रांगा!
sakal

बोलून बातमी शोधा

corona Vaccination

नांदगावला मोजक्याच लसी… लांबलचक रांगा!

sakal_logo
By
संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील लसीकरण मोहिमेने तब्बल ५० हजारांहून अधिकचा पल्ला गाठलाय. एकूण लोकसंख्येचा विचार करता लसीकरणाच्या मोहिमेने ४५ टक्क्यांपर्यंतचे उद्दिष्ट गाठले आहे. ही तशी समाधानकारक बाब आहे. तालुक्यातील लसीकरणाच्या सर्वच केंद्रांवर अपेक्षित कामगिरी असली तरी त्याला नांदगाव शहरातील नियोजन मात्र अपवाद ठरले आहे. (corona vaccination drive at nandgaon)


जेव्हा लसीकरण सुरू झाले तेव्हा आरोग्य विभागाच्या निकषात नांदगाव शहराचा अंतर्भाव नसल्यामुळे तहसीलदारांच्या दालनाबाहेर शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी आंदोलन केले. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातील या आंदोलनानंतर गोदावरी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले लसीकरण केंद्र जैन धर्मशाळेत हलविण्यात आले. लसीकरणातील प्राधान्यक्रम देण्याच्या मुद्द्यावर तेथूनही हे केंद्र जवळच्या सावंत कंपाउंडमध्ये स्थलांतरित झाले. मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी आरोग्य विभागाला लेखी पत्र देत ते केंद्र पालिका कार्यालयाजवळील कन्या विद्यालयात स्थलांतरित केले. मध्यवर्ती भागात लसीकरण सुरू झाल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे शहराच्या अन्य प्रभागातून लसीकरण केंद्राची मागणी आता पुढे आली आहे. केंद्रात भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर त्यांच्या समर्थकांनी आपल्या प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी तालुका आरोग्याधिकाऱ्यांकडे केली. अशीच मागणी अन्य पक्ष व सामाजिक संघटनांकडून होत असल्याने कुठला निर्णय घ्यावा, अशा संभ्रमात आरोग्य विभाग सापडला आहे. अर्थात, त्याला कारणही तसे आहे. नजीकच्या काळात पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने वर्तमानातील आणि भावी काळात इच्छुक असलेल्या मंडळींकडून आपापल्या भागात लसीकरण केंद्रे सुरू व्हावीत, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे सुरक्षितता म्हणून लसीकरण करून घेण्याबाबत नागरिकांत कमालीची जागरूकता वाढल्याने चहूकडे लसीकरण केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे. आजअखेर पहिला डोस ४२ हजार, तर दुसरा डोस आठ हजार ५५८ नागरिकांना देण्यात आला आहे. एकूण ५० हजार ५५८नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

हेही वाचा: पाणी टंचाई नको तर पाउस आणा; पालकमंत्र्यांचा भाजपला सल्लालसीकरण केंद्रावर गर्दी अन्‌ आजचा अनुभव

शहरातील नागरिकांसाठी मंगळवार, गुरुवार व शनिवार असे लसीकरणाचे नियोजन असून, दर आठवड्यात ५०० लशी पुरविल्या जातात. त्यासाठी पालिका प्रशासनाचे व्यवस्थापन व लसीकरण प्रक्रियेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी अशी यंत्रणा आहे. शनिवारी२०० व्यक्तींचे लसीकरण होणार होते. त्यासाठी सकाळी सातपासून रांगा लागल्या. केंद्राच्या दरवाजातून आत जाणाऱ्या व्यक्तीला नंबरचे टोकण देण्यात येत होते. रांगेत असलेल्या काही लोकांनी रांग मोडून माझ्याकडे टोकण आहे, असे म्हणत मध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला. प्रथम व रांगेत येणाऱ्या व्यक्तींचेच लसीकरण होईल, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने, तसेच कोणाचाही वशिला लावणार नाही, याची खात्री दिल्यानंतर लोक काहीसे शांत झाले.

हेही वाचा: पक्षांतर्गत डागडुजीसाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात

loading image