परिचारिका दिन विशेष : नागरिकांसाठी ‘त्या’ चालतेबोलते कोरोना समुपदेशन केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangita Satpute

परिचारिका दिन विशेष : नागरिकांसाठी ‘त्या’ चालतेबोलते कोरोना समुपदेशन केंद्र

इंदिरानगर (जि. नाशिक) : जगाला मॉडर्न नर्सिंगची संकल्पना समजावून देत त्याची अंमलबजावणी करणाऱ्या फ्लोरेन्स नाईटेंजल यांचा जन्मदिवस म्हणजेच १२ मे हा जगात ‘जागतिक नर्सिंग डे’ (international nurses day) म्हणून साजरा होतो. वर्षभरापासून शहर कोरोनाशी लढा देत आहे. त्यात महापालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका मोठी भूमिका बजावत आहेत. वडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत मुख्य समन्वयिका संगीता सातपुते या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांसाठी नाईटेंजल ठरल्या आहेत. गेले वर्षभर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचा मोठा भार कमी करणारे आरोग्य केंद्र म्हणून वडाळा आरोग्य केंद्राचे नाव घेतले जाते. या ठिकाणी सातपुते कार्यरत आहेत. (News About international nurses day 2021)

नगरसेवकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक..

रोज येणाऱ्या शेकडो रुग्णांची तपासणी करणे. रॅपिड टेस्ट असो की आरटी-पीसीआर चाचणी असो किंवा बाधित रुग्णांना देण्यात येणारी औषधे असो. प्रत्येक कामात त्यांनी येथे सुसूत्रता आणली आहे. वरिष्ठ डॉकटरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू असलेल्या लसीकरणातदेखील त्यांनी सुसूत्रता आणली आहे. हे सर्व करत असताना वरिष्ठांचे आदेश आणि त्यांना असलेल्या अपेक्षानुरूप त्या काम करत आहेत. हाताखाली असलेल्या परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्‍यांना सोबत घेऊन गेली वर्षभर त्या हे काम सचोटीने पार पडत आहेत. सध्या लसीकरणासाठी हमखास किमान पाचशे ते सातशे जणांची गर्दी असते. त्यातून अनेक वेळा हमरीतुमरीचे प्रसंग येतात, मात्र सर्वांशी सुयोग्य संवाद साधत त्या काम करत आहेत. वेळोवेळी येथे भेटी देणारे माजी खासदार किरीट सोमय्या, आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे आदींसह इतर सर्वच नगरसेवकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली

चालतेबोलते कोरोना समुपदेशन केंद्र...

रुग्णांचे समुपदेशन आणि त्यांनी काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन त्या करतात. हे सर्व सुरू असताना त्या गेल्या महिन्यात स्वतः तर बाधित झाल्याच शिवाय त्यांची मुलेदेखील बाधित झाली होती. मात्र सकारात्मकतेने या बाबीकडे बघत त्यावर मात करून पंधराव्या दिवशीच त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या. आता स्वतःचे उदाहरण बाधित रुग्णांना देऊन त्या त्यांचा आत्मविश्‍वास वाढत आहेत. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी त्या चालतेबोलते कोरोना समुपदेशन केंद्र ठरल्या आहेत.

(News About international nurses day 2021)

हेही वाचा: ऐन परीक्षा काळात ‘बत्ती गुल’! मान्सूनपूर्व कामे ठरताहेत डोकेदुखी

Web Title: News About International Nurses And Front Line Work During Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top