esakal | क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई

बोलून बातमी शोधा

Oxygen leak Nashik

क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता.२१) प्राणवायूच्या गळतीमुळे २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. कुणाला यात यश आले, तर कुणाला अपयश. या मृत्यूच्या तांडवात अनेकांनी आपले वडील, पती, पत्नी, आई, भाऊ गमविला. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही ही कुटुंबे अजूनही दु:खाच्या सावटात आहेत, तर कोणी रुग्णालयात दाखल असलेल्यांसाठी अजूनही धावपळ करत आहे. ज्यांनी आपले आप्तेष्ठ गमविले आहे, त्यांच्यामागे आता केवळ त्यांच्या आठवणी उरल्या आहेत

शेवटचा चेहरादेखील बघता आला नाही..!

दिगंबर नेरकर यांचा ऑक्सिजन गळती घटनेत मृत्यू झाला. नंदू नेरकर यांचे ते लहान भाऊ. कामानिमित्त दोघे भाऊ आणि नंदू यांचे कुटुंबीय असे सर्व एकत्र राहत. उपचारानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. फोनच्या माध्यमातून कुटुंबीय त्यांची दैनदिन खुशाली घेत होते. घटनेच्या काही वेळ आधी नंदू यांनी त्यांना नाश्‍ता खाऊ घातला. गप्पा मारल्या आणि इतक्यात त्यांना कासावीस वाटू लागले. कर्मचाऱ्यांना सांगितले असता त्यांनी घटनेबद्दल सांगितले. हे ऐकून पायाखालची जमीनच घसरली आणि काही वेळातच दिगंबर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाणाऱ्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. रोज सकाळी तो दूध वाटपास जात, आज सकाळीदेखील असे भासत होते. दुसरीकडे अन्य भाऊ आणि कुटुंबीय धुळे येथे राहावयास असल्याने त्यांना दिगंबरचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ग्रामस्थ पुन्हा आत येऊन देणार नाही, याची भीती तसेच घटनेच्या काही वेळात महापालिकेकडून अंत्यसंस्कार केल्याने आई आणि मोठ्या भावास येता आले नाही. त्यामुळे आईला मुलाचा शेवटचा चेहरादेखील बघता आला नाही.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

डॉ. झाकिर हुसेनसारख्या रुग्णालयात उपचार घेतल्यास भाऊ लवकर बरा होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षा मात्र त्याच रुग्णालयातील गलथान कारभारामुळे भावास मुकावे लागले. अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते झाले. अशी परिस्थिती कुणावरही येऊ नये.

- नंदू नेरकर (मृताचा भाऊ)

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता