esakal | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब

बोलून बातमी शोधा

Nashik Oxygen Leak

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकला गळती लागून २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भद्रकाली पोलिसांत अज्ञाताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. त्यानुसार तपासी पथकाने कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब घेण्यास सुरवात केली आहे.

कथडा येथील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय कोविड सेंटरमधील ऑक्सिजनच्या मुख्य टॅंकला बुधवारी (ता.२१) गळती लागून २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सर्व देशाला हादरून टाकणारी अशी घटना घडल्याने राज्य शासनाकडून याची दखल घेतली गेली. दोषींवर कारवाई होण्यासाठी तसेच घटनेचे नेमके कारण काय, यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भद्रकाली पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. दोन दिवसांपासून त्या त्यांच्या पथकासह भद्रकाली पोलिस ठाणे आणि रुग्णालयात तळ ठोकून आहेत.

हेही वाचा: नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड

रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कर्मचाऱ्यांसह प्लंटची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब घेत आहेत. शुक्रवारी (ता.२३) व शनिवारी (ता.२४) काहींचे जबाब झाले. कर्मचाऱ्यांकडून काय जबाब देण्यात आले, याची माहिती पोलिसांकडून गुप्त ठेवण्यात आली आहे. संपूर्ण तपास झाल्यानंतर तयार करण्यात आलेला अहवाल पोलिस आयुक्तांकडे सादर होईल, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांना जाब-जबाबात व्यत्यय येऊ नये, यासाठी रुग्णालय आवारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..