esakal | भाजपचे स्थानिक नेते नैराश्‍यातून सैरभैर; शिवसेनेचा भाजपवर पलटवार

बोलून बातमी शोधा

Shivsena BJP
भाजपचे स्थानिक नेते नैराश्‍यातून सैरभैर; शिवसेनेचा भाजपवर पलटवार
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेवरून शिवसेनेने सत्ताधारी भाजपवर केलेल्या टीकेनंतर भाजपनेदेखील जशास तसे उत्तर दिल्यानंतर शिवसेनेच्या ही बाब जिव्हारी लागली असून, शिवसेनेने वस्तुस्थिती लक्षात आणून दिली, की भाजपच्या स्थानिक नेत्यांना कायमच जिव्हारी लागते. त्या नैराश्यातून ते सैरभैर होतात आणि बेताल वक्तव्य करतात, असा पलटवार शिवसेनेने केला आहे.

वार-पलटवाराचा सिलसिला आजही सुरूच

एकीकडे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील घटनेची चौकशी सुरू असताना राजकीय शाब्दिक फेकाफेक सुरू झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत राजकारणापेक्षा नागरिकांना महामारीतून बाहेर काढण्याची मागणी नाशिककरांकडून होत आहे. ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेवरून शिवसेनेने महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पालक पिता कुठे गेला, अशी टीका केली होती. भाजपने त्यास उत्तर देताना राज्यातील अनेक घटनांचा उल्लेख करत या तत्त्वाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राजीनामा द्यायला पाहिजे होता, असा पलटवार केला. वार-पलटवाराचा सिलसिला आजही सुरूच राहिला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शुक्रवार (ता.२३) भाजपवर टीका केली. महापालिकेने मक्तेदारास दहा वर्षांसाठी संपूर्ण प्लांट नवीन बसविणे व चालविणे त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी करार केला आहे. तांत्रिक कर्मचारी नियुक्ती न केल्यामुळे ही घटना घडली आहे. त्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यामुळे मक्तेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी शिवसेनेची मागणी होती. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेत्यांनीसुद्धा मक्तेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती आणि दत्तक पित्याला माफी नाही, असे विधान केले होते, त्यांनी केलेले विधान योग्य असल्याची पुष्टी जोडली.

हेही वाचा: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई

बिनबुडाचे आरोप

सत्ताधारी म्हणून चुकीचे कामे करायचे व दोष मात्र शिवसेनेवर ठेवायचा हे चुकीचे आहे. शिवसेनेचा कुठलाही ठेकेदाराशी किंवा ठेक्याशी संबंध नाही, असल्यास त्यांनी पुरावे देण्याचे आवाहन शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. सत्ताधारी पक्ष म्हणून प्रत्येक ठरावावर सूचक व अनुमोदक म्हणून सत्ताधारी पक्षाचीच स्वाक्षरी असते, त्यानंतर विषयाला मंजुरी मिळते. त्यामुळे जबाबदारीपासून दूर जाता येणार नाही, असा सल्लाही शिवसेनेने भाजपला दिला.

भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील घटनेची जबाबदारी स्वीकारून महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. हीच भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे, त्यात गैर वाटून घेवू नये.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

हेही वाचा: शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं