Real Estate : पुढील 2 वर्षे रिअल इस्टेटच्या भरभराटीचे; 300 कोटींची उलाढाल अपेक्षित

Real Estate
Real Estateesakal

नाशिक : पायाभूत सुविधांच्या भरभराटीमुळे आगामी दोन वर्षे नाशिकच्या रिअल इस्टेटला सुगीचे दिवस आणणारे आहेत. जवळपास ५० हजारापर्यंत सदनिका विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने ग्राहकांनादेखील प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी हेच दिवस फायद्याचे ठरणार आहे. (Next 2 years of real estate boom 300 crore turnover expected Nashik news)


देशात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा वरचा क्रमांक लागतो. त्याला कारण म्हणजे मुंबई व पुण्यापासून नजीक असलेले अंतर. त्या व्यतिरिक्त नाशिकचे हवामान आल्हाददायक असल्याने निवृत्तीनंतर अनेक जणांची नाशिकला घर घेऊन राहण्याची पसंती आहे. परिणामी नाशिकचे रिअल इस्टेटचे मार्केट दिवसेंदिवस वर जात आहे. नाशिकचे रिअल इस्टेटचे मार्केट जोर पकडण्याचा ठराविक कालावधी आतापर्यंत नोंदविला गेला आहे. यात २००२ ते २०१० हा आठ वर्षाचा कालावधी या व्यवसायाची व शहर विकासाची भरभराट करणारा ठरला. त्यानंतर अनेक कारणांमुळे झटके खात आता व्यवसाय स्थिरस्थावर होताना दिसत आहे.

विल्होळी येथील खत प्रकल्पावरील कचरा वाढण्यास घरांची वाढती संख्या कारणीभूत असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने दिल्यानंतर वर्षभर बांधकामे बंद करण्याच्या सूचना राष्ट्रीय हरित लवादाने दिल्या होत्या. त्यानंतर नगर विकास मंत्रालयाच्या एका प्रिंटिंग चुकीमुळे आठव्या मजल्यावरील स्पेस ऐवजी फ्लोअर असा उल्लेख झाल्याने बांधकाम व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान करणारा ठरला. त्यानंतर नाशिकमधील बांधकामातील कपाटाचा तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या अनुषंगाने शेकडो प्रॉपर्टी बाधित झाल्या. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने आर्टिलरी सेंटरच्या संरक्षक भिंतीपासून ठराविक अंतरावरील इमारतींना परवानगी देण्यास नकार दिल्याने त्यातूनदेखील प्रॉपर्टी कायद्याच्या कचाट्यात अडकल्या.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Real Estate
Nashik Winter Update : ओझरसह परिसर गारठला; पारा 5.7 अंशावर

घरे खरेदीसाठी मोठी संधी

२०१७ पूर्वी शहर विकास आराखडा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शहर विकास आराखड्यात दुरुस्ती करण्यात आली असली तरी नाशिकसंदर्भात पार्किंगचे नियम क्लिष्ट करण्यात आल्याने त्यातून मोठे प्रकल्प हाती घेण्यास बांधकाम व्यावसायिक सरसावले नाही. निळ्या व लाल पूररेषेमुळे बाधित झालेल्या इमारती आधी विविध प्रकारच्या कारणांमुळे नाशिकच्या बांधकाम व्यवसायाला घरघर लागली होती, मात्र युनिफाईड डीसीपीआर मंजूर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटले.

त्यात डिसेंबर २०२१ पर्यंत प्रीमिअम शुल्कात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये प्रकल्प मंजूर झाले. त्या प्रकल्पांच्या माध्यमातून पुढील दोन वर्षात जवळपास ५०००० पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका नाशिकमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय बरोबरच ग्राहकांसाठीदेखील घरे खरेदी करण्याची मोठी संधी असल्याचे मानले जात आहे. या माध्यमातून येत्या दोन वर्षात नाशिकमध्ये जवळपास ३०० कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे मत बांधकाम व्यावसायिकांकडून व्यक्त केले जात आहे

Real Estate
Nandurbar Crime News : नवापूरला तलवारीच्या वारासह जोरदार हाणामारी ; 4 जण जखमी

ही आहेत महत्त्वाची तेजीची कारणे

- नाशिक जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग.
- सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग.
- पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे.
- प्रस्तावित टायर बेस मेट्रो निओ प्रकल्प.
- केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाकडून लॉजिस्टिक पार्क साठी झालेली घोषणा.
- महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा.
- राज्य सरकारचा प्रस्तावित फूड प्रोसेसिंग प्रकल्प.
- निफाडचा प्रस्तावित ड्रायपोर्ट.
- पुणे- नाशिक महामार्गाचे विस्तारीकरण.
- मुंबई- नाशिक महामार्गाचे प्रस्तावित विस्तारीकरण.

"नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत आहे. त्या माध्यमातून प्रगतीचा वेगदेखील वाढेल. त्या अनुषंगाने घरांच्या मागणीतदेखील वाढ होत आहे."

- रवी महाजन, अध्यक्ष, नाशिक क्रेडाई मेट्रो

"नाशिकमध्ये घर घेणे हे काळाची गरज आहे. हे अनेकांना माहीत झाल्याने घर खरेदी कडे कल वाढला आहे. त्या अनुषंगाने मोठ्या व छोट्या प्रकल्पातून तेवढे प्रमाणात सदनिका उपलब्ध होत आहे." - कृणाल पाटील, उपाध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो.

Real Estate
Dhule News : शिंदखेड्यातील परेशने दाखविला माणुसकी धर्म; 70 वर्षांच्या आजीला केली मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com