निफाड (जि.नाशिक): आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांचा मृत्यू होणे नैसर्गिक आहे. मात्र दिंडोरी तास (ता.निफाड) येथे शिकारीला आलेल्या बिबट्यावर शेतकऱ्याच्या दोन पाळीव कुत्र्यांनी जिवाची बाजी लावत हल्ला चढवीत जखमी केले. कुत्र्यांच्या जबड्यातून बिबट्याने कशीबशी सुटका करून पळ काढला.