Farmers Protest
sakal
निफाड: कांद्याचे भाव कोसळल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी युवासेना वक्त्या प्रियांका जोशी, शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली निफाड बाजार समितीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.