Nilkanth Nandurkar Passed Away: चित्रकार नीलकंठ नांदुरकर यांचे 88 व्या वर्षी निधन

Painter Nilkanth Nandurkar passed away nashik news
Painter Nilkanth Nandurkar passed away nashik news

Nashik News: पुरुषोत्तम इंग्लिश स्कुल व श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कुल येथील निवृत्त कला शिक्षक श्री. नीलकंठ नांदुरकर यांचे आज आज निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.

बालपणापासून ते एक उत्तम चित्रकार, मूर्तीकार, कथा कथनकार होते. त्यांचे चित्रकलेचे शिक्षण मुंबई येथे जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् येथे झाले. तेथे असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते सहभागी झाले. (Nilkanth Nandurkar passed away nashik news)

या चळवळीची चित्रकलेची सर्व कामे त्यांनी विनामूल्य केली. कै. आचार्य अत्रे यांच्या नवा काळ या साप्ताहिकात व दैनिक मराठा या वृत्त पत्रात व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी काम केलं.शाहिर साबळे यांच्या कला पथकात ते सहभागी झाले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या " भाषा शुद्धी " या पुस्तकाचे मुखपृष्ठ

त्यांनी काढलं. मुंबई सोडून ते पुन्हा नाशिक रोड येथे आले व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव, पुरुषोत्तम इंग्लिश स्कुल व श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल या शाळांमध्ये त्यांनी कला शिक्षक म्हणून निष्ठा पूर्वक काम केलं.1993 साली ते सेवा निवृत्त झाले.

अनेक साधू संतांची सुमारे शंभर तैल चित्रे त्यांनी काढली. ती महाराष्ट्र व कर्नाटक येथे विराजमान झाली आहेत. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या चोळाप्पा मठास स्वामींचे भव्य तैल चित्र काढून त्यांनी अर्पण केले होते. त्याबद्दल त्यांना स्वामी प्रसादही मिळाला होता.

साहित्य क्षेत्रात त्यांनी बरेच कार्य केलं. श्रीपाद लिलामृत हे त्यांचे गुरु बेळगावचे कै. श्री काणे महाराज यांचे चार हजार ओव्यांचे चरित्र लिहून त्यांनी स्वतः चित्रांकित केलं. गजानन लिलामृत हे संत गजानन महाराज यांचे ओवी बद्ध चरित्र लिहून स्वतः चित्रांकित केले. संत निळो बाराय यांच्या जीवनावर आधारित "तुमचे पायी ठेवीयले मन " ही त्यांची कादंबरी बरीच गाजली. या खेरीज "जैसी गंगा वाहे ", "परमहंस " या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या.

Painter Nilkanth Nandurkar passed away nashik news
Nashik News: यंत्रमाग व्यवसाय मंदीच्या कचाट्यात! मजुरांना आठवड्यातून तीनच दिवस मिळतेय काम

" परमहंस " ही त्यांची भगवान रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावर आधारित कादंबरी पुणे येथील continental या दर्जेदार प्रकाशनाने प्रकाशित केली. या खेरीज त्यांचे तीन कथा संग्रह, पाच बालनाटये, दोन बालकथा संग्रह, 1 संगीत नाटक अशी पुस्तकं प्रकाशित झाली होती. "अबब, विठोबा बोलू लागला " हे त्यांचे बालनाट्य अतिशय गाजले.

हे नाटक 1979 साली सौ. सुधा करमरकर यांच्या लिटल थिएटर या संस्थेने व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. सुप्रसिद्ध अभिनेते कै. श्री. लक्ष्मीकांत बेरडे हे याच नाटकाने पुढे आले. या नाटकाचा गुजराथी अनुवादही गाजला. संगीत दाक्षायणी हे त्यांचे संगीत पौराणिक नाटक राज्य नाट्य स्पर्धेत अनेकदा सादर झाले. कै. भार्गवराम आचरेकर यांचे संगीत या नाटकाला लाभले होते.

या खेरीज श्री. नांदुरकर हे एक उत्तम व्यासंगी प्रवचन कार, रंगभुषाकार, नेपथ्यकार, दिगदर्शक, अभिनेते, पेटी वादकही होते. त्यांच्या मागे के. के. वाघ इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, साहित्यिक व प्रवचनकार डॉ. जोगेश्वर नांदुरकर, चित्रकार श्री. गोपाळ नांदुरकर, 3 सुना, 2 नातू व 1 नात असा परिवार आहे. या विविध पैलू असलेल्या थोर कलावंत व्यक्तीमत्वाच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.

Painter Nilkanth Nandurkar passed away nashik news
Nashik ZP News: जि. प. शिक्षणाधिकारी कोण यांचा गुरुवारी होणार फैसला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com