नाशिक- बहुचर्चित निफाड ड्रायपोर्टला मध्य रेल्वेशी जोडण्यासाठी पिंपळस व कसबे-सुकेणे गावातील ३.९९ हेक्टर खासगी क्षेत्र संपादित करायचे आहे. भूसंपादनाच्या अधिसूचनेवर हरकती घेण्यासाठी सोमवार (ता. ७)ची मुदत आहे. ही मुदत संपुष्टात आल्यावर ॲवॉर्ड घोषित करून तातडीने भूसंपादन पूर्णत्वासाठी निफाड प्रांतधिकाऱ्यांनी तयारी केली आहे.