Nashik Water Crisis: निफाडच्या शेतकऱ्यांचा पाणीटंचाईशी सामना! पाणी जायकवाडीसाठी सोडल्याने कालव्यांच्या आवर्तनात घट

उशाला दोन कालवे, पायथ्याला गोदावरी नदीमुळे ‘ग्रीन झोन’ म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहेत.
Farmers engaged in onion cultivation.
Farmers engaged in onion cultivation.esakal
Updated on

Nashik Water Crisis : उशाला दोन कालवे, पायथ्याला गोदावरी नदीमुळे ‘ग्रीन झोन’ म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहेत.

गोदावरी खोऱ्यातील पाणी जायकवाडीसाठी सोडल्याने कालव्यांच्या आवर्तनात घट झाली. कमी पर्जन्यमान असल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.()

नदीपात्रातील पाण्याचा उपसा वाढून पाणीपातळीही झपाट्याने घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. उभे असलेले पीक पाण्याच्या कमतरतेमुळे करपून जाऊ नये, लवकरात लवकर रब्बी हंगाम पूर्ण व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

डिसेंबर व जानेवारीमध्ये होणारी रब्बी कांदालागवड पाण्याची कमतरता लक्षात घेऊन नोव्हेंबरपासूनच जोरात सुरू आहे. कांदा रोपवाटिका तयार नसल्याने चांदवड, येवला व सिन्नर तालुक्यांतून कांदा रोपे खरेदी करून लवकर कांदालागवड केली. दुष्काळ सदृश्यपरिस्थितीमुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक कांदा लागवड झाली आहे.

स्थानिक मजूरटंचाई निर्माण झाल्याने कांदा रोपांसोबत मजूर शेतकरी बाहेरूनच घेऊन येत आहेत. यामुळे उत्पादन खर्चात आणखी वाढ होत आहेत. कांदा लागवडीसाठी येणारा प्रतिएकर सरासरी खर्च ६० ते ७० हजार आहे. या सर्व बाबींचा वस्तुनिष्ठ विचार करून नव्या वर्षात कांदा निर्यातबंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Farmers engaged in onion cultivation.
Nashik Water Crisis: नांदगाव, देवळा, चांदवडच्या दुष्काळासाठी आमदार सरसावले; दुष्काळाच्या झळा

एकरी कांदा उत्पादन खर्च (रुपयांत)

रोपवाटिका निर्मिती-२० हजार

नांगरणी- ५००

फणनी व रोटावेटर- ३५००

सारे पाडणे, वाफे बांधणी- ४ हजार

लागवड आणि रोप उपटणे- १४ हजार

खते, कीटकनाशके- २० हजार

निंदणी- पाच हजार

कांदे काढणी- १० हजार

Farmers engaged in onion cultivation.
Nashik Water Crisis: जिल्हा टंचाई कृती आराखडा 10 कोटीने वाढणार!

''राज्यात दुष्काळीस्थिती असूनही शेतकरी जीवाचे रान करून कांदा पिकवत आहे. यात अवकाळी पाऊस, गारपीटसारख्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी उद्धवस्त होत आहे. या परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी निर्यातबंदी करून खड्ड्यात गाडत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाचे मातेरे करून काय साधत आहे.''-गजानन घोटेकर, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

''थंडीच्या कडाख्यात रात्री अपरात्री बळीराजा शेताच्या बांधावर पिकाला पाणी देत असतो.काबाडकष्ट करत स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यानं फुकटची दमडी ही नको.सरकारकडून अनुदानाची भीक नको पण निर्यातबंदीचे कुत्र आवराव.''-पांडुरंग जाधव,शेतकरी धारणगाव खडक.

Farmers engaged in onion cultivation.
Nashik Water Crisis: उन्हाळ कांद्याचे भवितव्य चणकापूरसह इतर धरणांच्या आवर्तनावर अवलंबून!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com