निफाड: नांदगाव सावकार वस्ती येथे शनिवारी (ता. २३) सायंकाळी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. केशव निकम यांचा मुलगा श्लोक (वय ८) राहत्या घराजवळून अचानक बेपत्ता झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुलगा दिसेनासा झाल्याचे लक्षात येताच घरच्यांची धावपळ सुरू झाली. मुलगा हरविल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांमध्ये ‘बिबट्याने उचलले असावे’ अशी चर्चा रंगली. या अफवेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.