Brinjal Farming
sakal
शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीची जोड दिली तर ती कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचा भक्कम आधार ठरू शकते, हे निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी येथील शेतकरी दौलत टर्ले यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. मर्यादित क्षेत्र असूनही त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय आज त्यांच्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरला आहे. केवळ दहा गुंठे क्षेत्रात त्यांनी वांगी पिकाची लागवड करून उल्लेखनीय उत्पादन घेतले आहे.