
Nitesh Rane Controversy: मांस विक्री करणाऱ्या हिंदू दुकानदारांना झटका मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. यावरुन राज्यात बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहेत, राजकीय-सामाजिक वातावरणही ढवळून निघालं आहे. त्यातच मंत्री महोदयांना नाशिकमध्ये हिंदू खाटीक समाजान चांगलाच झटका दिला आहे. आम्ही हलाल पद्धतीनंच मटण विक्री करणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.