Dhanoli Small Irrigation Project: धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पास दुसरी प्रशासकीय मान्यता : नितीन पवार

Irrigation Project File photo
Irrigation Project File photoesakal

Dhanoli Small Irrigation Project : तालुक्यातील धनोली गावाजवळ सापुतारा नदीवर असलेल्या धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य विमोचक दुरुस्ती व प्रकल्प अंतर्गत उजवा कालव्याची दुरुस्ती व बांधकाम करण्यासाठी २१ कोटी ६७ लाख रुपये सुधारित दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली. (Nitin Pawar statement Second administrative approval for Dhanoli Small Irrigation Project nashik)

तालुक्यातील धनोली गावाजवळ सापुतारा नदीवर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम २००६ मध्ये पूर्ण झाले होते. धनोली उजवा कालवा १८ किमी व डावा कालवा १४. ३० किमी लांबीचे असून दोन्ही कालव्याची कामे २००७ मध्ये पूर्ण करण्यात आली आहेत.

धनोली डावा कालवा अंतर्गत ७०२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होत असून उजवा कालव्यातर्गत ८९२ हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. डावा कालव्यामुळे कळवण तालुक्यातील धनोली, बापखेडा, शेपूपाडा, जिरवाडे, भांडणे, दळवट, शिंगाशी, वेरुळे, या गावांची ७०२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत असून उजवा कालव्याअंतर्गत धनोली, शेपुपाडा, श्रुंगारवाडी, तताणे, दरेगाव, जामले, कोसुर्डे, भाकुर्डे, करमेळ (क). या गावांचे ८९२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. धनोली पाटबंधाऱ्याची साठवण क्षमता ४.९१४ दलघमी असून सिंचन क्षेत्र १ हजार ५९४ हेक्टर आहे.

या दोन्ही कालव्याची कामे जुनी झाली असल्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. त्यामुळे दोन्ही कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून परिसरातील आदिवासी शेतकरी करत होते.

सांडव्याची गळती होत असल्यामुळे सद्यःस्थितीत पाटबंधारे विभागाने सीओटी करुन काळी माती भरण्यात आल्यामुळे गळती थांबविण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Irrigation Project File photo
Farmers Seed Purchase : शेतकऱ्यांची बियाणे खरेदीची लगबग! खरेदी करताना घ्यावी काळजी

मात्र पाणीगळती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी व प्रकल्प अंतर्गत उजव्या कालव्याची दुरुस्ती संदर्भात आमदार नितीन पवार यांनी मंत्रालयात स्तरावर जलसंपदा विभागाच्या बैठकीत धनोली प्रकल्प गळती व कालवा दुरुस्ती कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी प्रश्न उपस्थित करुन राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.

त्यानंतर धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या विविध विकासकामासाठी प्रथम १७ कोटी ६२ लाख रुपयांची प्रथम प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रकल्प अंतर्गत दुरुस्ती व उजव्या कालव्याची दुरुस्ती व बांधकाम करण्यासाठी अतिरिक्त ४ कोटी ७ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देत राज्य शासनाने २१ कोटी ६७ लाख रुपयांची दुसरी प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे या कामांना पुढील काळात गती मिळणार आहे.

"कळवण तालुक्यातील धनोली, बापखेडा, शेपूपाडा, जिरवाडे, भांडणे, दळवट, शिंगाशी, वेरुळे, शेपुपाडा, श्रुंगारवाडी, तताणे, दरेगाव, जामले, कोसुर्डे, भाकुर्डे, करमेळ (क) परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणाऱ्या धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्ती,भूसंपादन व कालवा दुरुस्ती कामासाठी २१ कोटी ६७ लाख रुपयांची दुसरी प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली आहे." - आमदार नितीन पवार

Irrigation Project File photo
Nashik: वेतन रखडल्याने गटसचिवांचे कामबंद आंदोलन; सहकार खात्याअंतर्गत सर्व निवडणूकांच्या कामकाजावर बहिष्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com