Nashik: वेतन रखडल्याने गटसचिवांचे कामबंद आंदोलन; सहकार खात्याअंतर्गत सर्व निवडणूकांच्या कामकाजावर बहिष्कार

Baglan Taluka Group Secretary Association giving a statement to the Cooperation Officer Mr. Waghchoure regarding the strike.
Baglan Taluka Group Secretary Association giving a statement to the Cooperation Officer Mr. Waghchoure regarding the strike.esakal

Nashik News : जिल्हा प्रशासनाकडून नाशिक जिल्ह्यातील गटसचिवांचे फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे वेतन विनाकारण थांबवून गटसचिवांची आर्थिक कुचंबणा केली जात आहे.

यासंदर्भात वारंवार मागणी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली जात नसल्याने तालुक्यातील गटसचिवांची विनावेतन शुक्रवार (ता.१६) पासून बागलाण तालुक्यातील गटसचिव संघटनेने कामबंद आंदोलनास सुरवात केली आहे. (Strike by group secretaries due to salary freeze Boycott of all election work under Cooperative Department Nashik)

यासंदर्भात बागलाणच्या सहाय्यक निबंधक कार्यालयास दिलेल्या निवेदनात, जिल्ह्यातील सर्व गटसचिवांचे फेब्रुवारी पासून मे महिन्यापर्यंतचे वेतन जिल्हास्तरीय समितीने कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार न करता बेकायदेशीरपणे रोखलेले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गटसचिवांचा उदरनिर्वाह, मुलांचे शैक्षणिक खर्च, घराचे कर्जाचे हप्ते, वैद्यकीय समस्या याबाबत मोठी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. यासंदर्भात सोमवारी (ता.१२) निवेदन देऊन कळविण्यात आलेले आहे.

परंतु, प्रशासनाने गटसचिवांच्या मागण्यांचा कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही. वेतन नसल्याने गटसचिव व त्यांच्या परिवाराची अवहेलना होत असल्याने जिल्ह्यातील गटसचिवांची विनाकारण आर्थिक कुचंबणा होत असून गटसचिवांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Baglan Taluka Group Secretary Association giving a statement to the Cooperation Officer Mr. Waghchoure regarding the strike.
Nashik: 2 सत्रात कांद्याचे लिलाव, टोमॅटोसाठी खळे वाढवणार! नायगाव, पांढुर्लीत शेतकऱ्यांच्या अडचणींविषयी मंथन

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गटसचिवांची विनावेतन काम करण्याची मानसिकता नसल्याने यापुढे वेतन मिळेपर्यंत संस्थांचे कामकाज, जिल्हा बँकेचे कामकाज, शासन स्तरावरील सर्व कामकाज, लेखापरीक्षण, सर्व सहकार खात्याअंतर्गत सर्व निवडणुकांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून कामबंद आंदोलन सुरू करीत आहोत.

आमच्या आंदोलनामुळे सहकारी संस्था, शेतकरी, सभासद व इतर प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही समस्या उद्भवल्यास त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी गटसचिव संघटनेच्या जिल्हा पतसंस्थेचे संचालक सुनील देवरे, माजी सभापती प्रशांत सोनवणे, सभापती आनंदा साळुंके, संचालक प्रमोद पवार, रामदास जगताप, मोठाभाऊ दळवी, अनिल बहिरम, बापू गवळी, बाळू कामडी, निंबा भाटेवाल, जिल्हा गटसचिव संघटनेचे सदस्य अनिल खरे, दिनेश मोरकर आदी उपस्थित होते.

Baglan Taluka Group Secretary Association giving a statement to the Cooperation Officer Mr. Waghchoure regarding the strike.
Farmers Seed Purchase : शेतकऱ्यांची बियाणे खरेदीची लगबग! खरेदी करताना घ्यावी काळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com