Nitin Upasani
sakal
नाशिक: शालार्थ आयडी आर्थिक अपहार व फसवणूक प्रकरणी शहर पोलिसांनी अटक केलेला तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याचा नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सोमवारी (ता. १५) ताबा घेतला जाईल. उपासनी सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, गुन्ह्याचे फिर्यादी व नंतर संशयित असलेले भाऊसाहेब चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.