Nashik Bribe Crime : NMCच्या लाचखोर तांत्रिक सहायकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

Nashik Bribe Crime : NMCच्या लाचखोर तांत्रिक सहायकास अटक

नाशिक : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील बांधकाम विभागाच्या तांत्रिक सहाय्यकास २४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ता.१४) रंगेहाथ अटक केली. भाऊराव काळू बच्छाव (४५, तांत्रिक सहाय्यक, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभागीय कार्यालय, सिडको) असे लाचखोराचे नाव आहे. (NMC bribery technical assistant arrested Nashik Bribe Crime news)

हेही वाचा: Nashik Crime News : जायखेडा पोलिसांनी कारवाईत जप्त केला 30 लाखांचा गुटखा!

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, महापालिकेच्या डांबरी रस्त्यापलीकडे केबल टाकण्याकरीता तक्रारदार ठेकेदाराकडून लाचखोर भाऊराव बच्छाव याने २५ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २४ हजार रुपये देण्याचे निश्‍चित झाले होते. याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. संशयित बच्छाव यास पंचासमक्ष रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.

पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे व सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला. दीड महिन्यापूर्वीच महापालिकेच्या एकाला लाचखोरीत अटक झाली होती. यामुळे मनपातील लाचखोरी पुन्हा उघडकीस आली आहे.

हेही वाचा: Nashik News : बापू गांधीनगरचे रहिवासी भोगताय नरकयातना!