NMC Clean Survey: महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण’ला सुरवात! जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या नृत्य, पथनाट्य स्पर्धा

महापालिकेकडून स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे
NMC Clean Survey
NMC Clean Surveyesakal

नाशिक : महापालिकेकडून स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शहरात नव्याने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ तयारी सुरू केली जाणार आहे.

यात ६ व ७ फेब्रुवारीला महाकवी कालिदास कलामंदिरात शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य व पथनाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. (NMC Clean Survey swachh Survekshan started Students dance street drama competition for public awareness nashik)

केंद्र सरकारकडून दरवर्षी देशभरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविली जाते. सर्वेक्षणानंतर देशातील स्वच्छ शहरांचा निकाल जाहीर केला जातो.

२०२३ करिता देशपातळीवर राबविण्यात आलेल्या सातव्या स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिक शहर देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत गेल्यावर्षी २० व्या स्थानी आले.

देशभरातील ४,४७० शहरांमध्ये ७५ व्या स्थानावरून ३९व्या स्थानावर मजल मारली. आता आठव्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ची घोषणा केंद्र शासनाने केली. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांकरिता नृत्य व पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेतील सहभाग विनामूल्य असणार आहे. स्पर्धेत नृत्य सादरीकरणास ४ ते ५ मिनिटे व पथनाट्य सादरीकरणास ६ ते ८ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.

NMC Clean Survey
NMC News : 10 कोटींचा निधी परतीच्या मार्गावर! महापालिकेचे ई-चार्जिंग स्टेशन अद्यापही अपूर्ण

स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार ५०० व ५ हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल तसेच सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी आपल्या प्रवेशिका ४ फेब्रुवारी २०२४पर्यंत घनकचरा व्यवस्थापन विभाग (मुख्यालय) येथे अथवा health.nashikcorporation@gmail.com या ई –मेल वर पाठवाव्यात. असे आवाहन करण्यात आले आहे.

नृत्य, पथनाट्य स्पर्धेचे विषय

- ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्याचे फायदे

- प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम

-स्वच्छतेप्रति नागरिकांचे कर्तव्य

-नदीपात्राचे होणारे प्रदूषण व संवर्धनाचे उपाय

NMC Clean Survey
Nashik News: पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास प्रारंभ! पहिल्या टप्प्यात सुमारे 15 हजार शिक्षक भरती प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com