Latest Marathi News | पाऊस कमी झाल्यावर रस्ते चकचकीत करणार : NMC आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC latest News

पाऊस कमी झाल्यावर रस्ते चकचकीत करणार : NMC आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

नाशिक : सरासरीपेक्षा व अधिक वेगाने पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर खड्डे होत असून, नियमित कामकाजातदेखील अडथळा निर्माण होत आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर महिन्याभरात नाशिक शहरातील रस्ते पूर्वीप्रमाणे तयार करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पत्रकार परिषदेत दिले. (NMC Commissioner Dr Chandrakant Pulkundwar statement about road repairing Nashik Latest Marathi News)

आयुक्त पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (ता. १६) इंडियन स्वच्छता लीग संदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर माध्यमाने रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर त्यांनी दिले. ते म्हणाले, सातत्याने पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहे. जीएसबी मटेरिअलने खड्डे बुजवूनदेखील उपयोग नाही.

त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे बुजविले जातील. उत्सव काळात खड्डे बुजविण्यात आले. मात्र त्यानंतरही सातत्याने व वेगाने पाऊस पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. पाऊस थांबल्यानंतर पूर्वीप्रमाणेच जैसे थे रस्ते होतील. स्मार्टसिटीची सुरू असलेली कामे गॅस पाइपलाइन आदी प्रकारच्या कामांसाठी रस्ते खोदल्याने नागरिकांना त्रास झाल्याचे मान्य करताना ती कामेदेखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशभर गॅसचे जाळे विणण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम होत आहे. त्यामुळे शहरात पाइपलाइनदेखील गरजेची आहे. मात्र, शहरात फरक इतकाच की पावसाळ्यापर्यंत खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. आताही खड्डे खोदण्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत, परंतु ते नाकारण्यात आले आहे.

पावसाळ्यानंतर परवानगी दिली जाईल. रस्त्यांमुळे नागरिकांना झालेला त्रास लक्षात घेता ३० एप्रिलपर्यंतच खड्डे खोदण्याची परवानगी आहे. त्यानंतर कोणालाही खड्डे खोदण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार

पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रस्त्यांची कामे केली जातील. पूर्वीप्रमाणे खड्डे विरहित रस्ते करताना आवश्यक असेल तिथे महापालिका स्वतः खर्च करेल ज्या रस्त्यांचे दायित्व तीन वर्षासाठी ठेकेदारांकडे आहे, त्या रस्त्यांची कामे संबंधितांकडून करून घेतली जातील. महिन्याभरात रस्ता दुरुस्ती न झाल्यास त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे.

हेही वाचा: Crime : मालेगावात घरफोडीचे सत्र सुरुच; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी चोरी

सिग्नलवरील भिकाऱ्यांची डोकेदुखी

शहरात सिग्नल वर मोठ्या प्रमाणात भिकारी आढळून येत आहे. वाहनांच्या काचा पुसणे, छोट्या- मोठ्या वस्तू विक्री होत असल्याचे दिसत असले तरी त्याच व्यक्तींकडून भीकदेखील मागितली जाते. अशा लोकांना निराधारगृहात वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली, मात्र एक-दोन दिवस ते लोक थांबतात व पुन्हा सिग्नल वर भीक मागताना आढळून येतात. ही बाब प्रशासनासाठी डोकेदुखी असल्याचे आयुक्त पुलकुंडवार यांनी मान्य केले. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना आखण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

कोविड सेंटर बंद होणार

कोरोना तिसरी व चौथी लाट फारशी प्रभावी न ठरल्याने आता कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कठडा रुग्णालय वगळता महापालिकेचे व खासगी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Super Phosphateमुळे कांद्याचे नुकसान; मंगरुळला शेकडो एकरवरील पिक नष्ट

Web Title: Nmc Commissioner Dr Chandrakant Pulkundwar Statement About Road Repairing Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..