धोकादायक घर, वाड्यांचे नळजोडणी तोडण्याच्या मनपा आयुक्तांच्या सूचना

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
Nashik Municipal Commissioner Ramesh Pawaresakal

नाशिक : शहरातील अतिधोकादायक १११७ घर, वाडे व इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. दोन नोटिशीनंतरही स्वतःहून घर रिकामे न करणाऱ्यांचे नळजोडणी (Water supply) तोडण्यात येणार आहे. तसेच, पोलिसांच्या मदतीने घरे रिकामे करण्याची कारवाई होणार आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC commissioner) यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. (NMC Commissioner instructions to disconnect water supply dangerous houses and palaces nashik news)

महापालिका दरवर्षी शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती, वाडे तसेच घरांना नोटिसा बजावते. संबंधित घरमालक नोटिसा घेतात, परंतु त्यावर कारवाई करीत नाही. नेमेचि येतो पावसाळा या न्यायाने दरवर्षी हा नोटिशीचा खेळ सुरू असतो. परंतु, यंदा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी थेट कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या नोटिशीनंतर एक महिन्याच्या काळानंतर दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरदेखील घरे रिकामे न झाल्यास जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलिस प्रशासनाच्या मदतीने महापालिका कारवाई करणार आहे. संबंधितांची यादी वीज वितरण कंपनीला देऊन त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
मास्टर मॉल आग; सलग 28 तास उलटूनही आगीचा भडका कायम

महापालिकेने दिलेले पाण्याचे नळ कनेक्शन कापण्यात येणार आहे. जुने नाशिक, पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दर पावसाळ्यात कोसळण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. भाडेकरू व घर मालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असले तरी त्याबाबत कारवाई होत नाही. मात्र, आयुक्तांच्या भूमिकेमुळे शहरातील हा जुना तसेच गंभीर प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
Nashik : 'मविप्र' संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com