Nashik NMC News : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रियेतून करणार वसुली!

nmc property tax latest marathi news
nmc property tax latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली ढोल मोहीम आता बंद करून त्याऐवजी लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३० मालमत्ता जप्त करून लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (NMC dhol bajao drive stop Now recovery will done through auction process Nashik NMC News)

मालमत्ता कराच्या कर थकबाकी साडेतीनशे कोटींच्या वर पोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या संकेतस्थळावर १२५८ बाकीदारांची यादी जाहीर केली. मात्र, यादी जाहीर होऊनही थकबाकीदारांना काहीच फरक पडत नसल्याने महापालिकेने ढोल बजाओ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.

सहा विभागात सहा ढोलपथक नियुक्ती करून महापालिकेने दिवाळीच्या अगोदर थकबाकीदारांना घाबरून सोडले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोहीम स्थगित करण्यात आली, मात्र त्यानंतर पुन्हा दोन दिवसासाठी मोहीम सुरू झाली. ६९२ थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजवून एकूण सात दिवसात पाच कोटी ३४ लाख रुपये वसूल करण्यात आले.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

nmc property tax latest marathi news
Nashik Crime News : कळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एवढ्या मोठ्या प्रमाणात मोहीम राबवूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर आता मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलावाच्या माध्यमातून प्राप्त होणारे रक्कम थकबाकीकडे वळवून अशाप्रकारे वसुली केली जाणार आहे.

मालमत्ता करणार नावावर

थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती वॉरंट बजावले जाणार आहे. त्यानंतर थकबाकी भरण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतरही थकबाकी केल्यास मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. लिलावालादेखील प्रतिसाद न मिळाल्यास एक रुपया भरून संबंधित मालमत्ता महापालिकेच्या नावावर केली जाणार आहे.

nmc property tax latest marathi news
Nashik Crime News : धान्य वितरण व्यवस्थेतील धान्यसाठा जप्त; ग्रामीण पोलीसांची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com