NMC News : गोदेतील पानवेली अडविताना पालिका कर्मचाऱ्यांची दमछाक! पालिका नियोजनाचे पितळ उघड

दोन तासांची दमछाक यशस्वी झाली असली तरी पालिकेच्या नियोजनाचे पितळ मात्र उघडे पडले.
NMC news
NMC newsesakal

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याचे अचूक नियोजन करताना काही चुक राहू न देण्याच्या स्पष्ट सूचना होत्या.

त्या सूचनांचे पालन करताना गोदावरी नदीतील पानवेलींनी अडचण निर्माण झाल्याने एकीकडे पंतप्रधानांच्या हस्ते गोदावरी पूजन सुरु असताना दुसरीकडे गोदावरी नदीवरील पुलावरून दोर लावून पानवेली अडविण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागली.

दोन तासांची दमछाक यशस्वी झाली असली तरी पालिकेच्या नियोजनाचे पितळ मात्र उघडे पडले. (NMC employees tired while blocking Panveli in Godavari river municipal planning exposed nashik)

मागील आठवड्यात पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर आले होते. प्रारंभी दौऱ्यात फक्त तपोवनातील मोदी मैदानावरील जाहीर सभा एवढेच नियोजन होते.

त्यानंतर कार्यक्रम वाढत गेला. तब्बल चार तास मोदी नाशिकमध्ये होते. जाहीर सभेपूर्वी रोड शो, श्री काळाराम मंदिर दर्शन व गोदावरी घाटावर गंगापूजन हे कार्यक्रम जोडले गेले.

गोदावरी नदीचे पूजन सुरु होण्यापूर्वी नदीत वाहते व स्वच्छ पाणी राहणे आवश्‍यक होते. त्यादृष्टीने सहा तास अगोदर गंगापूर धरणातून तीनशे क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दोन तासांनी पाण्याचा वेग दोनशे क्युसेक करण्यात आला. धरणातून पाणी वाहत असताना बापू नर्सरी पूल, जुने पंपिंग स्टेशन या भागातील पात्रातून पानवेली देखील वाहत्या पाण्याबरोबर वाहून आली.

पंतप्रधान गोदा पूजा करताना पानवेलीत उभे राहूनच पूजा होईल अशी परिस्थिती येणार होती. परंतु काही अधिकारांच्या लक्षात ही बाब समजल्यानंतर त्यांनी पानवेली थांबविण्याच्या सूचना केल्या. ऐनवेळी पानवेली नदीपात्रातून थांबविणार कशा असा प्रश्‍न निर्माण झाला.

NMC news
NMC News : शहरात महिना अखेर स्वच्छता मोहीम; मंदिरांबरोबरच सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता

त्याचवेळी चोपडा पूल, आनंदवली पुलावरून दोरखंड टाकून प्रवाहासोबत वाहून येणारी पानवेली थांबविण्यात यश मिळाले. दोन तासांची यशस्वी झुंज मात्र पालिका प्रशासनाचा कारभार उघड्यावर पाडणारा ठरला.

गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

पानवेली हटविण्यासाठी यांत्रिकी विभागाने पाण्यात चालणारे ट्रिमर यंत्रे खरेदी केले आहेत. ट्रिमरने पानवेली का हटविली नाही. असा सवाल उपस्थित होत आहे.

पंतप्रधानांची पूजा सुरु असताना पानवेली वाहून आल्या असत्या तर गोदावरी प्रदूषणावरुन पालिका प्रशासनाला उत्तर द्यावे लागले असते. त्यामुळे ‘थोडक्यात वाचलो’ अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर अधिकारी वर्गात चर्चेली जात आहे.

NMC news
Nashik: शेवगा यंदा देणार आर्थिक ‘आधार’! कसमादेतून तमिळनाडू, गुजरातमध्ये मागणी वाढली, भावही टिकून राहण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com