NMC Ghantagadi Contract: घंटागाडी चौकशीचे आदेशच कचऱ्यात; आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

NMC Ghantagadi Contract : शहरात घनकचरा संकलनासाठी सुरु असलेल्या घंटागाड्यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने आठ दिवस होऊनही चौकशीच केली नाही.

विशेष म्हणजे घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे समिती सदस्यांना दादच देत नसल्याचे खुद्द समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने डॉ. कुटे यांच्याकडून चौकशी समितीला सामोरे न जाण्याच्या कृतीवर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (NMC Ghantagadi Inquiry Order Wasted Attention to role of Commissioner nashik news)

महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घंटागाडी संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये विशेष करून सातपूर व पंचवटी भागातील तक्रारींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

अनियमित घंटागाडी येणे, नियोजित मार्गावर घंटागाडी न धावणे, घंटागाडीवर जीपीएस न बसविणे, कचरा विलगीकरण न होणे यासंदर्भातील तक्रारींचा समावेश आहे. पंचवटी व सातपूर विभागात अडीच टन घंटागाडी ऐवजी ६०० किलो क्षमतेच्या घंटागाड्या चालविणे.

नियमानुसार अडीच टन गाडी नसेल तर दररोज दहा हजार रुपये दंड करण्याची अट करारामध्ये आहे. तर जीपीएस नसेल तर दररोज एक हजार रुपये दंड ठेकेदारांकडून वसूल करण्याच्या सूचना आहे.

मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियमांचे उल्लंघन होत असताना देखील दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी सातपूर व पंचवटी विभागातील घंटागाडी ठेकेदारा संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर दहा कोटी रुपयांचे देयके रोखून धरण्यात आली होती.

मात्र ती देयके तातडीने अदा करण्यात आल्याने संशय बळावला. एकूणच तक्रारींचा अनुषंगाने आयुक्त गमे यांनी घंटागाडीच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC News: होर्डिंगवर जिओ टॅगिंग लावण्याचा निर्णय; 150 होर्डिंगधारकांकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर

वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी व घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे या चौघांचा चौकशी समितीत समावेश आहे.

निविदेतील अटी व शर्ती प्रमाणे काम होत आहे की नाही याची तपासणी करून आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या होत्या. परंतु, चौकशी लागताच डॉ. कुटे आठ दिवसांच्या रजेवर गेल्या.

आठ दिवसानंतर गमे प्रभारी आयुक्त पदाचा पदभार निघून जाईल व नियमित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे पदभार स्वीकारतील असा अंदाज धरून ही रजा काढण्यात आल्याचे बोलले जात होते.

परंतु डॉ. पुलकुंडवार यांची बदली झाल्याने गमे यांच्याकडेच आयुक्त पदाचा कार्यभार आहे. त्यामुळे समितीने चौकशी करणे अपेक्षित असताना अद्यापही चौकशी सुरु होत नसल्याने घंटागाडी ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याचे बोलले जात आहे.

चौकशीला दाद नाही

दरम्यान, चौकशी समितीने आठ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या. परंतु, समिती सदस्य आठ दिवसांच्या रजेवर असल्याने चौकशी झाली नाही.

आता चौकशी साठी समिती सदस्या व घनकचरा विभागाच्या डॉ. कल्पना कुटे या समिती सदस्यांना दात देत नसल्याचे लेखाधिकारी नरेंद्र महाजन यांनी सांगितले.

NMC Nashik News
NMC News : महापालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com