
Nashik : जाहिरात फलकांसाठी महापालिकेचे धोरण
नाशिक : महापालिकेतर्फे (NMC) शहरातील चौकात सुशोभीकरणासाठी (beautification) प्रायोजकांना संधी दिली जाते. पण प्रायोजकांशी करार झाल्यानंतर त्यांनी किती मोठ्या आकाराच्या जाहिराती (Advertisement) करायच्या याचे मात्र निश्चित धोरण नसल्याने शहरभरात प्रायोजकांच्या (sponsors) इच्छेनुसार चित्रविचित्र स्वरूपाचे फलक झळकतात, मात्र यात आता सुसूत्रता येणार आहे. (NMC New policy for hoardings Nashik News)
महापालिकेचे आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) जाहिरात फलकाच्या आकाराबाबत धोरण निश्चित करीत आहे. नव्याने महापालिकेकडून १३२ चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने केलेले जाहिरात फलकांचे धोरण अमलात येणार असल्याने शहरभर जाहिरात फलकांत सुसूत्रता दिसणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सगळ्या चौकांचे सुशोभीकरण करताना आयुक्तांनी जुन्या चौकांचे करार नव्याने तपासण्यास सुरवात केली आहे. नाशिक धार्मिक नगरी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. वर्षभर जगभरातील भाविक नाशिकला येतात. दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो, तर जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणीदेखील मोठ्या संख्येने भाविक जातात. नाशिकच्या सौंदर्यीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार १३२ चौकाची यादी तयार केली आहे. चौकांचे सुशोभीकरण करताना त्यात एकसारखेपणा असावा प्रत्यक्षात तो तसा दिसावा, असे प्रयत्न आहे. शहरातील सीबीएस, शालिमार येथील इंदिरा गांधी चौक, रविवार कारंजा, अशोक स्तंभ यांच्यासह इतर लहान- मोठे चौकाचा समावेश आहे. दरम्यान, चौकांचे सुशोभीकरण झाल्यानंतर नाशिकचा एक वेगळा ठसा जगभरात निर्माण होणार आहे. तसेच येणाऱ्या भाविकांनादेखील नाशिक नगरी सुंदर वाटणार आहे.
हेही वाचा: रेल्वे स्टेशन मास्तरांचा ३१ मे ला संप
धोरणातील नोंदी
- दुभाजकांवर २० ते २५ मिटर अंतरावर फलक
- जाहिरात फलक २ बाय एक आकाराचे असावे
- एका बाजूला प्रायोजक, दुसरीकडे मनपाचे नाव
- सुशोभीकरणाच्या अटी-शर्तीवर नियमित लक्ष
हेही वाचा: ब्लॅक स्पॉट बाबत शहरात सर्व्हेक्षण; शहर घाण करणाऱ्यांना बसणार चाप
Web Title: Nmc New Policy For Hoardings Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..