NMC Night Cleanliness Drive : शहरात दिवाळीत रात्रीचीही स्वच्छता | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

NMC Night Cleanliness Drive : शहरात दिवाळीत रात्रीचीही स्वच्छता

नाशिक : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर पडत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिवसा व रात्रीदेखील स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांसोबतच अतिरिक्त घंटागाडीदेखील ठेवली जाणार आहे. (NMC Night Cleanliness Drive Diwali night cleanliness in city Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Diwali 2022 : आनंद द्विगुणित करण्यासाठी घ्या खबरदारी; MSEDCLचे आवाहन

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, कचरा संकलन करण्यासाठी नियमित घंटागाड्यांबरोबरच पत्रिका घंट्यागाड्यांचीदेखील व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर दिवसा सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर रात्रीदेखील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता केली जाणार आहे. स्वच्छता संदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत बैठक घेण्यात आली.

त्यात निर्णय घेण्यात आला. पश्चिम विभागात सध्या ३८ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन केले जाते. तेथे चार अतिरिक्त घंटागाड्यांचे व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य विभागात चाळीस घंटा गाड्या असून, तेथेही चार गाड्या वाढविण्यात आल्या आहेत. नाशिक रोड, पंचवटी, सिडको व सातपूर या भागातदेखील अतिरिक्त घंटागाडी ठेवली जाणार आहे.

हेही वाचा: Diwali Padwa 2022 : दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!

टॅग्स :Nashiknmc