NMC Promotion Scam: जम्पिंग प्रमोशनचे इतिवृत्त मंजूर करण्याची घाई! पात्र अभियंत्यांमध्ये नाराजी

Nilesh Sali, Nitin Rajput and Rajesh Palve
Nilesh Sali, Nitin Rajput and Rajesh Palveesakal

NMC Promotion : महापालिकेसाठी राज्य शासनाने नवीन सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली आहे.

नवीन मंजूर सेवा प्रवेश नियमावलीनुसार पदोन्नती बेकायदेशीर ठरते. त्यामुळे बॅक डेटेड इतिवृत्त मंजूर दाखवून पदोन्नती पदरात पाडून घेण्याची तयारी बांधकामासह नगररचना विभागातील काही अभियंत्यांनी केली आहे. (NMC Promotion scam Hurry to approve minutes of jumping promotion Resentment among qualified engineers nashik news)

नाशिक महापालिकेमध्ये गेल्या एक ते दीड वर्षात मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या पदोन्नतीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. यामुळे काही अधिकारी कर्मचारी, तसेच अभियंत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या अन्यायाच्या भावनेचा गेल्या काही दिवसात मोठा स्फोट झाला असून, काही कर्मचारी न्यायालयातदेखील गेले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पाठोपाठ सफाई कर्मचारी विकास युनियननेदेखील प्रभारी आयुक्तांकडे पदोन्नतीतील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

पदोन्नतीच्या गैरव्यवहारात थेट मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने चुकीच्या पद्धतीने पदोन्नती घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पदोन्नतीला कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी इतिवृत्त मंजूर करून घेण्याची घाई सुरू आहे. इतिवृत्त मंजूर झाल्यास पदोन्नतीचे लाभ पदरात पाडून घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nilesh Sali, Nitin Rajput and Rajesh Palve
NMC Promotion : महापालिकेच्या इतिहासातील पदोन्नत्यांचा सर्वात मोठा गैरव्यवहार? घोडे-पाटलांचे कारनामे

जम्पिंग प्रमोशन प्रकरण भोवणार

अभियंता संवर्गात शाखा अभियंता असलेल्या नीलेश साळी, नितीन राजपूत व राजेश पालवे यांनी जम्पिंग प्रमोशन घेतल्याचे बोलले जात आहे. तिघेही उपअभियंता पदावर कार्यरत असून कार्यकारी अभियंता पदासाठी आता ते प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक महापालिकेसाठी राज्य शासनाने नवीन सेवा प्रवेश नियमावली लागू केली आहे. नवीन सेवा प्रवेश नियमावली मध्ये पदोन्नतीचे निकष निश्चित करण्यात आले आहे. ६ जून २०२३ पासून सेवा प्रवेश नियमावली लागू झाली आहे.

त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेली पदोन्नती बेकायदेशीर ठरते. नवीन निकषानुसार त्या पदोन्नती बेकायदेशीर ठरल्यास न्यायालयात आव्हान देण्यासाठी इतिवृत्त मंजूर करण्याची घाई सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Nilesh Sali, Nitin Rajput and Rajesh Palve
NMC Promotion: सफाई कर्मचारी विकास युनियननेही थोपटले दंड! नि:पक्षपणे चौकशी न झाल्यास आंदोलनाचा ईशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com