Nashik | वृक्षकत्तलीबाबत मनपाने मागितले शासनाकडे मार्गदर्शन

NMC seeks guidance from state Government on Tree cutting Nashik News
NMC seeks guidance from state Government on Tree cutting Nashik Newsesakal

नाशिक : उंटवाडी भागातील पुलासाठी ४७४ वृक्षांची कत्तल करावी लागणार असून, त्याविषयी महापालिकेने (NMC) शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. मायको सर्कल उड्डाणपुलासाठी महापालिका प्रशासनाने वर्क ऑर्डर दिली आहे, मात्र या भागातील वृक्षांची कत्तल हा वादाचा विषय झाला आहे. गोदावरी प्रदूषणाप्रमाणे आता शहरातील वृक्षांच्या कत्तली (Arboriculture) विरोधात नागरिकांसह पर्यावरण प्रेमी रस्त्यावर येत असल्याने महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या भागाला भेट देऊन माहिती घेतली. विरोध वाढत गेल्याने हा विषय केवळ वृक्षांच्या कत्तलीपुरता न राहता, महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसताना आणि नागरिकांचा विरोध असतानाही महापालिकेकडून त्रिमूर्ती चौक आणि मायको सर्कलवर अडीचशे कोटींचे दोन उड्डाणपूल मंजूर केल्याने त्या विरोधात वातावरण तापवले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सोयीनुसार पावले उचलत आहे.

NMC seeks guidance from state Government on Tree cutting Nashik News
नरवणे म्हणाले, लष्करावर गुंतवणूक करा; कारण...

महापालिकेने एका बाजूला संबंधित कामाची वर्क ऑर्डर दिली असून, झाडांना हात न लावता काम सुरू करण्याची सूचना मनपाने दिली आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे वृक्षांच्या कत्तलीबाबत शासनाकडून (State Government) मार्गदर्शन मागविले आहे. प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम एम ६० सिमेंट वापरून होणार आहे. त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलाच्या कामात एकूण २४ झाड येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने याबाबत सर्वेक्षण करून अंतिम यादी तयार करून उद्यान विभागाकडे वर्ग केली आहे, तर उद्यान विभागाकडून मायको सर्कलच्या उड्डाणपुलामध्ये येणारे ४७४ झाड, त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलामध्ये येणाऱ्या २४ झाडासंदर्भात काय करायचे, याबाबतचे मार्गदर्शन शासनाकडे मागवले आहे.

NMC seeks guidance from state Government on Tree cutting Nashik News
शुभमंगल सावधान! रणबीर आलियाच्या लग्नाचे खास क्षण,पहा फोटो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com