NMC Tax Recovery Campaign : ढोल बजाओ मोहीम स्थगित | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

NMC Tax Recovery Campaign : ढोल बजाओ मोहीम स्थगित

नाशिक : मालमत्ता कर थकीत असलेल्या थकबाकीदारांच्या दारासमोर विविध कर विभागाने सुरू केलेली ढोल बजाओ मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून पुन्हा ही मोहीम नव्याने सुरू केली जाणार आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या १२५८ थकबाकीदारांच्या नावांची यादी महापालिकेकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली, मात्र त्यानंतरदेखील थकबाकीदारांची मानसिकता थकबाकी अदा करण्याकडे नव्हती. (NMC Property Tax Recovery Campaign Dhol Bajao Campaign Suspended Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : पोलिसांची खाकी वर्दीतील माणुसकी; शहीद जवानाच्या घरी दिवाळी सण साजरा

त्यामुळे महापालिकेच्या विविध कर विभागाकडून १७ ऑक्टोबरपासून थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाव मोहीम सुरू करण्यात आली. पाच दिवसात मोहिमेच्या माध्यमातून चार कोटी एक लाख १८ हजार ९४४ रुपये थकबाकी वसूल झाली. ४३५ थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजविण्यात आले.

मात्र, या मोहिमेला काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. दिवाळीच्या काळात मोहीम स्थगित करण्याची मागणी करण्यात आली त्यानुसार २२ ऑक्टोबरपासून मोहीम स्थगित करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून मोहीम सुरू करताना ८२३ थकबाकीदारांच्या घरासमोर, आस्थापनांसमोर ढोल वाजविला जाणार आहे.

हेही वाचा: नाशिक: महाराष्ट्राच्या सुपुत्राला सीमेवर वीरमरण; दिवाळीत गावावर शोककळा