NMC Tax Recovery: अडीच लाख थकबाकीदारांना नोटिसा!

NMC Tax Recovery
NMC Tax Recoveryesakal

NMC Tax Recovery : महापालिकेचे उत्पन्नात होणारे घट व सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी महापालिकेने वसुली मोहीम हाती घेतली आहे.

त्या अंतर्गत ४७० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी दोन लाख ३७००० थकबाकीदारांना विविध कर विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, १५ दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. (NMC Tax Recovery Notices to two half lakh arrears nashik)

२०२३ व २४ या आर्थिक वर्षासाठी विविध विभागाला मालमत्ता कराचे २१० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी महसुलात वाढ करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर घरपट्टीचे उद्दिष्ट १५ कोटींनी वाढवून २२५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले.

१ एप्रिल ते २२ ऑक्टोबर कालावधीमध्ये १२९ कोटी ७२ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली. जवळपास ९६ कोटी रुपये महापालिकेला वसूल करायचे आहे.

परंतु दुसरीकडे थकबाकीचा आकडा मोठा असल्याने थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मोहीम आखली आहे. ४७० कोटी रुपये वसूल करण्यासाठी दोन लाख ३७ हजार ८८५ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या.

यातील ८३७४ थकबाकीदाराने संपूर्ण रक्कम अदा केली आहे. सातपूर विभागात ३०,०५७३ तर पश्चिम विभागात १३, ७६९ मालमत्ताधारकांना नोटीस बजाविण्यात आल्या आहे.

NMC Tax Recovery
NMC News: परसेवेतील अधिकाऱ्यावरून शिंदे गटाची आगपाखड चर्चेत!

पूर्व विभागांमध्ये ४१,७५४ तर पंचवटी विभागांमध्ये ५९ हजार ९६१ व सिडको विभागात ५५ हजार ८३, नाशिक रोड विभागात ३६ हजार ४४५ थकबाकीदारांना नोटीस पाठवण्यात आल्या आहे. एकूण दोन लाख ३७ हजार ८८५ नोटीस बजावण्यात आल्या.

अशी आहे विभागनिहाय थकबाकी (कोटीत)

- सातपूर विभागात ३९ कोटी ६८ लाख, तर पश्चिम विभागात ४९ कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी आहे. नाशिक पूर्व विभागांमध्ये १०२ कोटी २८ लाख, तर पंचवटी विभागात १२४ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे.

सिडको विभागात ६८ कोटी ५६ लाख, तर नाशिक रोड विभागात ८५ कोटी ८६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

NMC Tax Recovery
NMC News: अनधिकृत दुकाने, 27 पानटपऱ्या जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com