NMC Tax Recovery : 200 कोटीपर्यंत महसूल उद्दिष्टाची झेप

recovery
recoveryesakal

नाशिक : आर्थिक वर्ष संपण्याच्या दोन दिवस अगोदर नगररचना विभाग महसुल उद्दिष्टापर्यंत पोचण्याची चिन्हे दिसू लागली आहे. बुधवारी (ता.२९) सायंकाळपर्यंत जवळपास दोनशे कोटीपर्यंत महसुल उद्दिष्टाची झेप घेण्यात आली.

वसुलीचे उद्दिष्ट २३६ कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष अखेरपर्यंत सव्वा दोनशे कोटी रुपयांपर्यंत महसुलाची झेप पोचेल, असा विश्वास नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. (NMC Tax Recovery Revenue target jumps to Rs 200 crore nashik news)

३१ मार्चला आर्थिक वर्ष पूर्ण होत असल्याने लेखा विभागात जवळपास दिडशे कोटीची मागणी नोंदविण्यात आली आहे. राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्काचा एक टक्का अधिभाराचे साडेतेरा कोटी रुपये प्राप्त झाल्याने दिलासा मिळाला. २०२२-२३ या आर्थिक वर्षांकरिता घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १५० कोटी, तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट साठ कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी हवा असेल तर घरपट्टी व पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याच्या राज्य शासनाकडून सूचना होत्या. त्यामुळे सुधारित अंदाजपत्रकामध्ये घरपट्टीसाठी १८५, तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी रुपयांचे निश्चित करण्यात आले.

वसुलीसाठी मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांची यादी तयार करून ७५ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविण्यात आली. थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजविण्यात आला. त्यामुळे घरपट्टीतून १८० कोटी रुपये महसुल प्राप्त झाला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

recovery
Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणुकीत तिसऱ्या दिवशी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल!

मागील वर्षी १३९ कोटी रुपये वसुल झाले होती. यंदाच्या वसुलीत ४२ कोटी रुपयांनी वाढ झाली. दरम्यान पाणी पट्टी वसुली मात्र संथगतीने सुरु आहे. पाणीपट्टी वसुलीचे ७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ६१ कोटी रुपये वसुली झाली.

नगररचना विभाग उद्दिष्टापर्यंत

नगररचना विभागाकडून विकास शुल्काच्या माध्यमातून महसुल मिळतो. या वर्षा अखेर २३६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. परंतु मागील वर्षात बांधकामाच्या परवानग्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्याने यावर्षी उद्दिष्टापर्यंत पोचणे अवघड होते.

परंतु नगररचना विभागाच्या प्रयत्नांनी आज अखेरपर्यंत दोनशे कोटींच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे.

recovery
Market Committee Election : मतदानापूर्वी 24 तास अगोदर प्रचार होणार बंद! आचारसंहिता लागू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com