
नाशिक: शहरात फक्त 38 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक
नाशिक : धरणात शहराला पुढील ३८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे चित्र चांगले आहे. मात्र, पुढील दहा दिवसांत पाऊस न झाल्यास मात्र पाणीकपात करावी लागणार आहे. जुलैच्या पंधरवड्यात पावसाने हुलकावणी दिली, तर नाशिक शहरात पाणी कपातीशिवाय महापालिकेला पर्याय राहणार नाही. (nmc water cutt off due to 38 days water left in gangapur dam in nashik)
जून संपत आला तरी, दमदार पावसाचे अजूनही दर्शन नाही. त्यामुळे धरण भरून पुढील वर्षभरासाठी पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी अडीच टक्के पाणीसाठा कमी आहे. पण त्याचवेळी मुकणे धरणात मात्र गतवर्षीच्या तुलनेत साधारण साडेसहा टक्के पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे महापालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक ५६०० दलघफू पाण्याची गरज असते. त्यापैकी साधारण ७१२ दलघफू पाणीसाठा गंगापूर समूहात शिल्लक आहे.
गंगापूर समूहात महापालिकेच्या वाट्याचा ७१२ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. शहरासाठी प्रतिदिन १९ दलघफू पाणी लागते. या न्यायाने आणखी ३८ दिवस शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. हे ढोबळ मानाने गणित आहे. मात्र, याचा अर्थ हे सगळे जुलै महिन्यात पाऊस होईल. असे गृहीत धरले तर हे आकडेवारीचे गणित लागू होणार आहे. समजा जुलैच्या आठवड्याभरात पाऊसच झाला नाही. धरणात पाण्याची पातळी वाढलीच नाही तर मात्र, नाशिक शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याचा धोका असल्याने शुक्रवार (ता.१) पासून पाणीवापराबाबत शहरातील नागरिकांना पावसाच्या आगमनानुसार लक्ष ठेवावे लागणार आहे.
टंचाई वर्षांची तुलना
अलीकडच्या पाच वर्षाचा विचार शहरातील पाणी टंचाईचा विचार करता, २०१९ वर्षात नाशिक शहराला टंचाईचा सामना करावा लागला. २०१९ मध्ये जून अखेरीस गंगापूर धरणात अवघा १३ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी शहराला पाणी कपातीचा सामना करावा लागला. त्यामुळे २०१९ वर्षांची तुलना करता यंदा जून अखेरीस २७ टक्के म्हणजे सरासरी दुप्पट पाणीसाठा आहे. त्यामुळेच यंदाच्या पुढील ३८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा निश्चित आहे. जुलैत पावसाने असेच हुलकावणी दिली, तर मात्र सगळे पाण्याचे गणित गैरलागू ठरणार आहे. म्हणूनच शहरातील पाणीटंचाईची स्थिती जुलैत महिन्यात होणाऱ्या पावसावर ठरणार आहे.
हेही वाचा: मांजरी : समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न गंभीर
महापालिकेच्या हिश्शाचा साठा
धरण समूह जुलै २१ जुलै २२ स्थिती
गंगापूर ( गंगापूर समूह) २७ टक्के -२४ टक्के -३ टक्के कमी
मुकणे (दारणा समूह) २३.५ टक्के - ३० टक्के - ७ टक्के अधिक
गंगापूर समूहाची स्थिती
धरण मागील वर्षी (टक्के) यंदा (टक्के)
गंगापूर २०६३ दलघफू ३७ १५२३ २७
कश्यपी ३०९ दलघफू १७ २९८ १६
गौतमी-गोदावरी २२४ दलघफू १२ ४४० २४
आळंदी ६३ दलघफू ८ १७ ०२
गंगापूर समूह २६५९ दलघफू २६ २२७८ २२
दारणा समूह ६६९४ दलघफू ३५ ३८२५ २
"शहरात सध्या तरी पाणीटंचाईची स्थिती नाही. मात्र, पावसाच्या आगमनाशी हा विषय निगडित आहे. त्यामुळे जुलैत पावसाने दमदार हजेरी लावणे गृहीत धरले आहे. या आठवड्यात धरणात पाणी संकलन सुरू होण्याची गरज आहे. पावसाने पाठ फिरवली, तर मात्र पाणी कपातीची टांगती तलवार कायम राहील."
- शिवाजीराव चव्हाणके, अधीक्षक अभियंता, महापालिका
हेही वाचा: पावसाळ्यात गेल्यावर्षीपेक्षा 244 टँकरद्वारे अधिक पाणीपुरवठा
Web Title: Nmc Water Cutt Off Due To 38 Days Water Left In Gangapur Dam In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..