Illegal Constructions
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतच्या बेकायदा बांधकामांवर हातोडा मारण्यासाठी आलेल्या ‘एनएमआरडीए’च्या बुलडोझरला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध झाला. ‘आमच्या अंगावर आधी बुलडोझर चालवा, मग घरावर!’ असा आक्रोश करत शेतकरी महिलांनी कारवाई पथकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोध डावलून प्रशासनाने कारवाई कायम ठेवत हॉटेल, पत्र्याच्या शेड्स, टपऱ्या यांसह सुमारे २५० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त केली.