esakal | #COVID19 : नाशिकमध्ये "नो' कोरोना!  पण स्वाइन फ्लू कक्षात मात्र..
sakal

बोलून बातमी शोधा

corona and swine flue.jpg

जिल्हा रुग्णालयातील पूर्वीच्या स्वाइन फ्लू कक्षाचेच रूपांतर कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात करण्यात आले. मात्र, गेल्या आठवड्यापासून स्वाइन फ्लूचेही रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यासाठी याच कक्षातील दोन वॉर्ड होते; परंतु आता स्वाइन फ्लू रुग्णांसाठी नवीन कुंभमेळा इमारतीतील चौथ्या मजल्यावर स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षामध्ये रविवारपर्यंत सहा रुग्ण असून, यातील दोघे पॉझिटिव्ह आहेत, तर चौघांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. 

#COVID19 : नाशिकमध्ये "नो' कोरोना!  पण स्वाइन फ्लू कक्षात मात्र..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जगभर थैमान घालणारा कोरोना व्हायरस बाधित एकही रुग्ण अद्याप नाशिकमध्ये नाही. शनिवारी (ता. 21) दाखल झालेल्या कोरोना संशयिताच्या स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झालेला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात एकही कोरोना संशयित नाही. दरम्यान, स्वाइन फ्लू विशेष कक्षामध्ये मात्र सहा रुग्ण असून, दोघे पॉझिटिव्ह, तर चौघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. 

त्याच्या स्वॅबच्या नमुन्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह...
नाशिक शहरासह जिल्ह्यात रविवार (ता. 22)पर्यंत एकही कोरोना विषाणूबाधित रुग्ण नसल्याचे प्राप्त झालेल्या वैद्यकीय चाचणी अहवालातून समोर आले आहे. जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 297 नागरिकांपैकी 54 संशयितांचे वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. शनिवारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षासह नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात चार संशयित रुग्ण दाखल होते. या संशयित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल रविवारी प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आहेत. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा थायलंडहून आलेल्या आणखी एका संशयितास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबच्या नमुन्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यालाही रविवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले असून, त्याची आरोग्य यंत्रणेकडून नियमित तपासणी केली जाणार आहे. कोरोनाबाधित देशांमधून आलेल्या 44 नागरिकांची 14 दिवस नियमित तपासणी करण्यात आली असून, त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
स्वाइन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष 
जिल्हा रुग्णालयातील पूर्वीच्या स्वाइन फ्लू कक्षाचेच रूपांतर कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात करण्यात आले. मात्र, गेल्या आठवड्यापासून स्वाइन फ्लूचेही रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यासाठी याच कक्षातील दोन वॉर्ड होते; परंतु आता स्वाइन फ्लू रुग्णांसाठी नवीन कुंभमेळा इमारतीतील चौथ्या मजल्यावर स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षामध्ये रविवारपर्यंत सहा रुग्ण असून, यातील दोघे पॉझिटिव्ह आहेत, तर चौघांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. 

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी
आकडेवारी 
* परदेशातून आलेले नागरिक : 297 
* 14 दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले : 44 
* दैनंदिन सर्वेक्षणातील रुग्ण : 253 
* कोरोना विषाणूबाधित रुग्ण : 00 
* दुबई 107, * सौदी 12, * अमेरिका 17, * इटली 13, * जर्मनी 8, * इंग्लंड 16, * इराण 8, * चीन 5, * अन्य देश 112 * एकूण : 297  

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!