लस घेतली नसेल तर दर्शन नाही, सप्तश्रृंगी मंदिर ट्रस्टची नवी नियमावली | Saptashrungi Darshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saptashrungi temple

लस घेतली नसेल तर दर्शन नाही, सप्तश्रृंगी मंदिर ट्रस्टची नवी नियमावली

वणी (जि. नाशिक) : सध्या कोरोनाने (Corona) पुन्हा डोक वर काढण्यास सुरुवात केली आहे, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट अत्यंत वेगाने पसरत आहे, दरम्यान यामुळे प्रशासन सावध झाले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या वणी येथील सप्तश्रृंगी मंदिरात दर्शन घेण्यासाठीचे (Saptashrungi Temple Darshan) नियम पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी - वणी गडावर प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून पुन्हा निर्बंध जारी केले, आता आदिमायेचे दर्शन आता कोविड लस (Corona Vaccination) घेतलेल्यांनाच मिळणार आहे. (Saptashrungi Temple New Rules)

विश्वस्त संस्थेने www.ssndtonline.org संकेस्थळावर ई दर्शन पास उपलब्ध करून दिले आहेत. भाविकांनी ई-दर्शन / ऑनलाईन दर्शन पासच्या माध्यमातून दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लसीकरणाचे किमान १ किंवा २ डोस पूर्ण केलेल्या भाविकांना श्री भगवती मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या भाविकांना श्री भगवती मंदिर दर्शन रांगेत रोप वे अथवा पायी मार्गे प्रवेश करावयाचा असेल त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचारी वर्गाला सादर करणे अथवा दाखविणे बंधनकारक आहे.

तसेच वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविक तसेच ग्रामस्थ यांना श्री भगवती मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच श्री भगवती मंदिरात रोप वे अथवा पायी मार्गे मास्क शिवाय प्रवेश नसेल तसेच सोशल डिस्टन्सींग राखणे सह कोविड नियमावंलीचे पालन बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे.

हेही वाचा: नाशिक : बिटको कोविड सेंटर येथे 15 ते 18 वयोगटाचे लसीकरण सुरू

असे आहेत नियम

किमान १ डोस पुर्ण केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश.

१० वर्षापेक्षा कमी, ६५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या ग्रामस्थांना प्रवेश बंद.

कोरोना त्रिसुत्रीचे पालन बंधनकारक.

मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य.

हेही वाचा: Oppo, Xiaomi कंपन्या अडचणीत; लागू शकतो तब्बल 1,000 कोटींचा दंड

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top