Nashik News: चांदवडचा दुष्काळ कुणालाच दिसत नाही! सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची आमदार राहुल आहेरांची भुमिका

rahul aher
rahul aheresakal

चांदवड : चांदवड तालुक्याला कुणी वाली आहे का नाही? तालुक्याला वाऱ्यावर का सोडता. आमच्याकडे भरपूर पाणी, चारा आहे, दुष्काळी तालुक्यांना आमच्याकडून घेऊन जा.

आमदार व अधिकारी तालुक्यात फिरले नाहीत का? त्यांना चांदवडचा दुष्काळ दिसला नाही का असा संतप्त सवाल चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्य शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून चांदवड वगळल्याने चांदवडकर प्रचंड संतापलेले आहेत. दरम्यान चांदवडचा दुष्काळी यादीत समावेश होईलच, नाही झाला तर आंदोलन करू अशी भूमिका आमदार राहुल आहेरांनी मांडली आहे. (No one sees the drought of Chandwad MLA Rahul Aher role in taking to streets against government Nashik News)

राज्य शासनाच्या निकषानुसार दुष्काळी यादीत समावेशासाठी लागणाऱ्या निर्देशांकात बसत असूनही जाणूनबुजून चांदवड तालुका वगळला आहे. पर्यायाने दुष्काळात शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांपासून तालुक्यातील शेतकरी, मजूर तसेच जनावरे वंचित राहणार आहेत.

यामुळे दुष्काळी यादीत चांदवड तालुक्याचा त्वरित समावेशाची मागणी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्यासह शेतकरी वर्गातून होत आहे. चांदवड तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने नदी-नाले, तलाव, विहिरी कोरडेठाक आहेत.

यामुळे संपूर्ण खरीप हंगामा वाया गेला आहे. भरपावसाळ्यात तालुक्यातील गावागावांत वाड्या-वस्त्यांवर शासनाद्वारे पिण्याच्या पाण्याचे टँकर पोहोचवून नागरिकांसह जनावरांची तहान भागवली जात आहे.

मुक्या जनावरांसाठी चाराच शिल्लक नसल्याने जनावरे उपाशी राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील असंख्य शेतकरी इतर जिल्ह्यातून मिळेल तिथून रोज जनावरांसाठी चारा आणत आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न इथे आहे.

rahul aher
Nashik Water Crisis: मोसम खोऱ्यात रब्बी हंगाम धोक्यात! जलसाठे कोरडेठाक; खरीप पिकांचेही नुकसान

शेतकरी, मजूर, कामगार यांना कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक शेतकरी, मजूर स्थलांतर करीत आहेत. इतकी भयावह परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

तरीही शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला नाही. यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे.

"चांदवड, देवळा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. असे असताना राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी यादी चांदवड व देवळा तालुक्यांचा समावेश नाही. यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. मी शासनाकडे चांदवड देवळा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली आहे. दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर होतील असा विश्वास आहे. शासनाने त्वरित चांदवड व देवळा तालुके दुष्काळी जाहीर करून न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू."- डॉ. राहुल आहेर, आमदार

"दुष्काळप्रश्नी आमदारांची अकार्यक्षमता दिसून येते. आमदार महोदयांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारकडून दुष्काळ जाहीर करून घ्यायला हवा. यांना शेतकऱ्यांशी काही घेणे नाही. आमदारांच्या व शासनाच्या या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. तत्काळ दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल."- शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार

"आमच्या तिसगाव हद्दीत थोड्याअंशी पाऊस झाल्याने जनावरांना चारा सुद्धा पुरेसा झालेला नाही. आमच्या गावात आजच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. माझी आमच्या समस्त तिसगाव ग्रामस्थ व चांदवड तालुक्याच्या वतीने राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे की आमच्या चांदवड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा."

- भूषण संजय गांगुर्डे, युवा सामाजिक कार्यकर्ता, तिसगाव

"चांदवड तालुक्यातील शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहेत. शेतीचे उत्पन्न एक रुपयाचे देखील नाही. अशा संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी आमदारांनी राहायला पाहिजे होते. परंतु ते तालुक्यातील लोकांची व्यथा जाणून घेण्यासाठी देखील येत नाही. शेजारचे तालुके दुष्काळी यादीत आहेत, परंतु आमचा चांदवड मात्र या यादीत नाही ही मोठी शोकांतिका आहे."

- भाऊसाहेब दाभाडे, वराडी, ता. चांदवड.

rahul aher
Nashik Water Crisis: 8 महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा! येवल्यात 47 वाड्यावस्त्यांची तहान भागते टँकरवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com