Nashik News: महाराष्ट्रातील गडकिल्यांवर रोप- वे होणार नाही; गड संवर्धन समिती

During the meeting of the Cultural Policy Sub-Committee
During the meeting of the Cultural Policy Sub-Committeeesakal

Nashik News : पर्वतमाला विकास योजनेंतर्गत गडकिल्ल्यांवर रोपवे बसविण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, सह्याद्रीच्या गडकिल्यांची परिस्थिती हिमालयापेक्षा भिन्न असल्यामुळे महाराष्ट्रातील किल्यांवर रोप- वे न उभारण्याचा ठराव गड संवर्धन समिती व सांस्कृतिक धोरण उपसमितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

त्यामुळे एखाद्या गडावर किंवा मंदिर, समाधीस्थळावर कोणालाही परस्पर काम करता येणार नाही, हे अधोरेखित झाले आहे. (no ropeway on forts in Maharashtra Fort Conservation Committee Nashik News)

नाशिकच्या सरकारवाड्यातील विभागीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात सोमवार (ता. ३) सांस्कृतिक धोरण उपसमितीचे अध्यक्ष बाबा नंदन पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या वेळी पुरातत्त्व विभागाचे राज्य संचालक डॉ. तेजस गर्गे, सहायक संचालिका आरती आळे, गडसंवर्धन समितीचे सदस्य गिरीश टकले, प्रशांत परदेशी, राजेंद्र टिपरे, अंकुर काळे, संदीप तापकीर, गणेश कोरे उपस्थित होते.

नाशिकमध्ये अंजनेरी व ब्रह्मगिरी तसेच राजगड, धोडप, मार्कंडेय या किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या रोप- वे संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. पर्वतमाला विकास योजनेअंतर्गत सह्याद्रीमध्ये रोप- वे केले जाऊ शकत नाही.

हिमालयीन परिस्थिती आणि सह्याद्रीतील परिस्थिती ही पूर्णपणे भिन्न असल्याने पर्वतमाला योजना सह्याद्रीत लागू होत नाही, असे मत समितीच्या सदस्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाला अंधारात ठेवून रोपवे सारखा संवर्धनशील प्रकल्प साकार केला जाऊ शकत नाही, असे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

During the meeting of the Cultural Policy Sub-Committee
Sula Vineyards: ‘सुला’च्‍या CEOपदी करन वसानींची नियुक्‍ती; राठी यांचा राजीनामा सामंतांकडून मंजूर

ज्या गडांवर घाईगडबडीने काही संस्थांनी कामे करून गडाच्या बांधकामांना इजा पोचवली, त्यांच्या विरोधात समितीच्या वतीने रीतसर तक्रार नोंदविण्याचे ठरविण्यात आले. अशी अनेक प्रकरणे समोर आल्याने संवर्धनातील काही नाजूक कामे ही पुरातत्त्व विभागाकडून करण्याचा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला.

यासाठी ज्या संस्थांना गडावर काही कामे करायची असतील त्यांनी मुख्यमंत्री निधीत आपला निधी जमा करावा व त्या निधीतून पुरातत्त्व विभागाने संबंधित वास्तूचे संवर्धन शास्त्रीय पद्धतीने व संवर्धनाच्या मापदंडास अनुसरून करावे, असे मत समितीच्या सदस्यांनी तसा ठराव पारीत केला.

वस्तुसंग्रहालयाची पाहणी

सरकारवाड्याचे नक्षीदार लाकडी खांब तथा वाड्याची चौसोपी बांधणी दीर्घकाळ जतन केलेला सांस्कृतिक वारसा आहे. त्याची पाहणी या समितीने केली. तसेच गोदावरीच्या काठावरील सुंदरनारायण मंदिराच्या कामाची पाहणी करण्यात आली.

अतिशय देखण्या पद्धतीने या मंदिराचे काम सुरू असून एक देखणी वास्तू मुळ स्वरूपात लवकरच उभी राहू शकेल, असा विश्वास या समितीने व्यक्त केला.

During the meeting of the Cultural Policy Sub-Committee
Nashik News: पंचवटी अमरधाममध्ये पाणीपुरवठा बंद! मृतांच्या नातेवाइकांना घरूनच पाणी घेऊन येण्याची वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com