Nashik Water Cut : काळजी नाही, मात्र पाणी जपून वापरण्याची गरज!

40 percent water storage in Gangapur Dam
40 percent water storage in Gangapur Damesakal

Nashik News : प्रशांत महासागरातील संभावित ‘अल निनो’ वादळामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त करून त्या दृष्टीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या असल्या तरी नाशिककरांना मात्र पाण्या संदर्भातील कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. (no water cut by nmc for now nashik news)

त्याला कारण म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत असे ९४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये आहे. एवढेच काय, मधल्या काळातदेखील पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. मात्र, नाशिककरांनादेखील पाणी जपून वापरावे लागणार आहे.

यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेने राज्यात सर्वात प्रभावी असा कृती आराखडा तयार करून शासनाला सादर केला.

उन्हाळ्याच्या पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एकदा त्यानंतर जून महिन्यात आठवड्यातून दोनदा, असे पाणीकपातीचे नियोजन केले. त्याशिवाय ११७८ विंधन विहिरी व महापालिकेच्या विहिरी ताब्यात घेऊन त्या स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पाणीकपातीचे नियोजन करण्याचे सर्वाधिकार विभागीय आयुक्तांना शासनाने दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

40 percent water storage in Gangapur Dam
Water Crisis: माणसांबरोबरच जनावरांचीही पाण्यासाठी वणवण; तोरंगण परिसरात भीषण पाणीटंचाई

अद्यापपर्यंत नाशिक महापालिका हद्दीमध्ये पाणी कपात झाली नाही व धरणातील सद्य पाणी साठ्याची स्थिती लक्षात घेऊन दररोज वीस दशलक्ष घनफूट पाणी उपसा धरणातून केल्यानंतरही ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल, अशी स्थिती आहे.

साधारण जून महिन्यात पावसाला सुरवात होते. जून महिना कोरडा गेल्यास जुलै महिन्यात पाणीकपात होण्याची शक्यता आहे. मात्र हवामान तज्ञांच्या अभ्यासानुसार जून महिन्यात पाऊस न पडण्याची स्थिती येणार नाही.

असे पुरेल पाणी

- गंगापूर धरणा मधून दररोज १४.५ दशलक्ष घनफूट पाणी उपसले जाते. ३१ ऑगस्टपर्यंत विचार केल्यास १३५० दशलक्ष घनफूट पाणी उपसा होईल.

40 percent water storage in Gangapur Dam
Water Crisis: नियोजनबाह्य आवर्तनाने धरणे कोरडीठाक! वाकी, भाम धरणांत केवळ मृतसाठा, पाण्यासाठी दाहीदिशा सुरू

- दारणा धरणातून दररोज एक दशलक्ष घनफूट पाणी उपसा केले जात आहे.

- मुकणे धरणातून दररोज पाच दशलक्ष घनफूट पाणी उपसले जात आहे ३१ ऑगस्टपर्यंत विचार केल्यास ४७० दशलक्ष घनफूट पाणी येथून उपसले जाईल.

-३१ ऑगस्टपर्यंत ९४ दिवसात एकूण १८५० दशलक्ष घनफूट पाणी तीनही धरणातून उपसले जाईल. त्यामुळे पाणीकपातीची आवश्यकता भासणार नाही. मात्र असे असले तरी जून महिना पूर्ण कोरडा गेल्यास पाणी कपातीचा विचार होऊ शकतो.

अशी आहे धरणाची स्थिती

- गंगापूर धरण - २७०० दशलक्ष घनफूट.
- मुकणे धरण- २९७८ दशलक्ष घनफूट.
- दारणा धरण- २७१७ दशलक्ष घनफूट.

40 percent water storage in Gangapur Dam
Water Shortage : येवल्यात २४ तास पाणीपुरवठ्या दिवास्वप्नच! 6 दिवसाआड पाणी पुन्हा चर्चेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com