Cold Wave
sakal
नाशिक: उत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीची जोरदार लाट आली असून, यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान शुक्रवारी (ता. १९) निफाड येथे ५.४ अंश सेल्सियस नोंदविले गेले. त्या खालोखाल धुळे येथे ५.६ अंश, नाशिक ७.४ अंश, अहिल्यानगर ७.३, तर जळगावचे तापमान ७.५ अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. कडाक्याच्या थंडीने अवघा उत्तर महाराष्ट्र गारठला. सायंकाळी चौकांमध्ये, ग्रामीण भागात पारावर शेकोट्या पेटवत थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो आहे.