महागाईच्या काळात ‘मन्सुरा’चा सुखद धक्का; आता बाईक धावणार एलपीजीवर

Now the bike will run on LPG with petrol nashik marathi news
Now the bike will run on LPG with petrol nashik marathi news

नाशिक/ मालेगाव कॅम्प : समाजातील गरजा ओळखून नवनवीन प्रयोग केले जातात. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या कुठल्याही बाबीला समाज प्राधान्य देतो. नवी पिढी तंत्रज्ञानात अशाच नव्या शोधांकडे वळत आहे. इंधनाच्या दरात होणारी वाढ, वाहनांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा वेळी इलेक्ट्रॉनिक्स दुचाकीकडे ग्राहक ओढला जातोय. त्यामुळे गरज ही शोधाची जननी असल्याची प्रचिती या विद्यार्थ्यांनी दिली आहे. 
 

ग्रामीण भागातही घरोघरी दुचाकी

ममौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकलच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कमी इंधनात जास्त चालणारी मिनी बाइक निर्माण केली आहे. राज्यभरात गाजणाऱ्या मन्सुरा काढाने प्रसिद्ध आलेल्या मन्सुरा कॅम्पसची ही नवी घोडदौड गौरवास्पद आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मोटारसायकल ही समाजाची प्राथमिक गरज बनली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही घरोघरी दुचाकी अशी स्थिती आहे. मात्र सर्वत्र महागडे पेट्रोल व डिझेलने सर्वसाधारण जनतेचे कंबरडे मोडत आहे. 

नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजातील समस्येचे निराकरण करतात. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘मिनी बाइक’ हा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करत समाजातील सर्वच घटकांना महागाईच्या काळात सुखद धक्का दिला आहे. मन्सुरा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील मोहम्मद अनस, शफिक अहमद, मोहम्मद जुनेद, यमान, अब्दुल अजीज यांनी हा प्रयोग यशस्वी केला. 

अतिशय कमी खर्चात निर्मिती

या मिनी बाइकसाठी प्रा. शहजाद मह्वी यांचे मार्गदर्शन लाभले. ही मोटारसायकल पेट्रोलसह एलपीजीवर चालणारी आहे. ती तयार करण्यासाठी साधारणपणे एका आठवड्याचा कालावधी लागतो. अतिशय कमी खर्चात ही मिनी बाइक बनविल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या नव्या संशोधनाचे संस्थेचे अध्यक्ष अर्षद मुख्तार, सचिव राशीद मुख्तार, प्राचार्य डॉ. ए. के. कुरेशी, उपप्राचार्य डॉ. मोहम्मद रमजान यांनी कौतुक केले. 

मिनी बाइकची वैशिष्ट्ये 
खर्च : २२ हजार रुपये 
वजन : ७० किलो 
इंजिन : १०० सीसीएसआय 
एक लिटर पेट्रोलमध्ये ६५ किलोमीटर तर एक लिटर एलपीजीमध्ये ११० किलोमीटर धावणार.

जनसामान्यांना पूरक निर्मिती 
महागाईच्या वणव्यात विद्यार्थी संशोधक वृत्तीने समाजाच्या गरजा ओळखण्याचे काम करतात. अशाप्रकारे नवनवीन तंत्रज्ञान वापरून कौशल्याद्वारे ही निर्मिती जनसामान्यांना पूरक आहे. संस्था या बाइकच्या पेटंटसाठी प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतील. 
- डॉ. ए. के. कुरेशी

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com