NTA Circular : IITसाठी बारावीत विशेष श्रेणी हवी; प्रवेशासाठी किमान टक्‍केवारीची अट पुन्‍हा लागू

IIT-JEE
IIT-JEEe sakal

नाशिक : आयआयटी, एनआयटी यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये जेईई परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जातो. परंतु आता जेईई मेन्‍स परीक्षेत राष्ट्रीय क्रमवारीत स्‍थान मिळविण्यासह विद्यार्थ्यांना बारावीलाही किमान ७५ टक्‍के गुण अर्थात, विशेष श्रेणीसह उत्तीर्ण व्‍हावे लागणार आहे. कोरोना महामारीदरम्‍यान शिथिल केलेली अट पुन्‍हा लागू झाली आहे. (NTA 12th special category required for IIT Minimum percentage requirement for admission again applicable nashik news)

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीच्‍या (एनटीए) माध्यमातून याबाबत परिपत्रक काढताना विद्यार्थ्यांना माहिती कळविली आहे. जेईइ मेन्‍स परीक्षा २०२३ च्‍या सूचनपत्रकात नमूद केल्‍यानुसार काही विद्यार्थी, पालकांनी शंका उपस्‍थित केली होती.

त्‍यावर सविस्‍तर माहिती जारी करताना ‘एनटीए’ने किरकोळ प्रमाणात बदलदेखील केले आहेत. त्‍यानुसार एनआयटी, आयआयआयटी, सीएफटीआय या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांसह ज्‍या इन्‍स्‍टिट्यूटमध्ये जेईई मेन्‍सच्‍या रँकिंगच्‍या आधारे प्रवेश दिला जाणार आहे, अशा ठिकाणी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बारावीच्‍या परीक्षेत किमान ७५ टक्‍के गुण मिळविणे आवश्‍यक होते.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

IIT-JEE
Nashik Air Service : Indigoतर्फे 15 मार्चपासून गोवा, अहमदाबाद, नागपूरला रोज उड्डाण

विविध घटकांकडून यासंदर्भात पुनर्विचाराची मागणी करण्यात आली होती. त्‍यानुसार सुधारित निकष ‘एनटीए’कडून जाहीर केले आहेत. त्‍यानुसार एनआयटी, आयआयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये जेईई मेन्‍सच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश मिळविताना विद्यार्थ्यास बारावीत किमान ७५ टक्‍के किंवा लेखी परीक्षा आयोजित केलेल्‍या संबंधित शिक्षण मंडळाच्‍या अव्वल २० पर्सेंटाईलमध्ये विद्यार्थ्याचा समावेश असावा.

एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीतील गुणांची अट ६५ टक्‍के राहणार आहे, असेही स्‍पष्ट केले आहे.

कोरोनातील शिथिल अट पुन्हा लागू

कोरोनाकाळात शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. त्यातच परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. अनेक बोर्डांनी मूल्‍यांकनाच्‍या आधारे निकाल जाहीर केले होते. तर गेल्‍या वर्षी परीक्षेसाठी अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. त्‍यामुळे प्रवेशासाठी किमान टक्‍केवारीची अटदेखील शिथिल ठेवली होती. परंतु आता ही अट पुन्‍हा लागू करण्यात आली आहे.

IIT-JEE
Nashik News : मुद्रांक नोंदणीचे शुल्कापोटी 30 हजार कोटी जमा; महसूल संकलनात राज्य उच्चांक गाठणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com