esakal | नाशिक ग्रामीणला कोरोनाचा विळखा घट्ट! दैनंदिन आकड्यात शहराला पछाडले

बोलून बातमी शोधा

Nashik Corona Updates

नाशिक ग्रामीणला कोरोनाचा विळखा घट्ट! दैनंदिन आकड्यात शहराला पछाडले

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. चिंतेची बाब म्‍हणजे नाशिक शहराला दैनंदिन आकड्यांमध्ये मागे टाकत नाशिक ग्रामीणमधील नव्‍याने आढळणारे बाधित व मृतांची संख्या अधिक झाली आहे. शुक्रवारी (ता.23) जिल्‍ह्‍यात झालेल्‍या 49 मृत्‍यूंपैकी ग्रामीण भागातील 33 मृतांचा समावेश आहे. तर जिल्‍ह्‍यातील चार हजार 596 बाधितांमध्ये नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक दोन हजार 247 बाधितांचा समावेश आहे.

आरोग्‍य व्‍यवस्‍था खिळखिळी झालेली असल्‍याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूचे प्रमाण अद्यापही नियंत्रणात आलेले नाही. जिल्‍ह्‍यात झालेल्‍या 49 मृत्‍यूंमध्ये सर्वाधिक 33 मृत्‍यू नाशिक ग्रामीणमधील होते. तर नाशिक महापालिका क्षेत्रात पंधरा, मालेगाव महापालिका क्षेत्रात एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. नाशिक तालुक्‍यातील शिंदगाव येथील 24 वर्षीय युवती, तर आडगाव येथील 22 वर्षीय युवकाचाही कोरोनाने बळी घेतला आहे.

तर जिल्‍ह्‍यात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत दोन हजार 175, नाशिक ग्रामीणमध्ये दोन हजार 247, मालेगाव महापालिका क्षेत्रात 130, जिल्‍हा बाहेरील 44 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यातील पाच हजार 826 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक तीन हजार 836 अहवाल नाशिक ग्रामीण, एक हजार 660 अहवाल नाशिक शहर, तर मालेगावच्‍या 330 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा कायम होती. जिल्‍हा भरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात चार हजार 938 रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील चार हजार 564 रुग्‍ण असून, जिल्‍हा रुग्‍णालयात बारा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात 25 रूग्‍ण दाखल झाले आहेत.

हेही वाचा: शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं

निफाड तालुक्‍यातील मृतांची वाढती संख्या चिंताजनक

जिल्‍ह्‍यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूचे थैमान सध्या सुरु असून, याच्‍या केंद्रस्‍थानी निफाड तालुका आहे. गेल्‍या काही दिवसांत या तालुक्‍यातील मृतांची संख्या लक्षणीयरित्‍या वाढत आहे. शुक्रवारी निफाडमधील बारा बाधितांचा मृत्‍यू झाला. त्‍यापाठोपाठ येवला तालुक्‍यात पाच, पेठ तालुक्‍यात तीन, बागलाण तालुक्‍यासह कळवण व चांदवड तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन, मालेगाव व नाशिक तालुका, सुरगाणा, देवळा, सिन्नर, दिंडोरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला आहे.

हेही वाचा: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई