Nashik: नायलॉन मांजा आढळून आल्यास पतंग उडवणाऱ्यावर कारवाई! वावी पोलीसांकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन

पतंग उडवताना नायलॉन मांजा आढळून येणाऱ्यास देखील कारवाईला सामोरे जावे लागेल.
nylon manja found action will taken against kite flyer Awareness of students in schools by Vavi Police
nylon manja found action will taken against kite flyer Awareness of students in schools by Vavi Policeesakal

सिन्नर : संक्रांत सणानिमित्त पतंग उडवताना मानवी तसेच पशुपक्ष्यांच्या जीवितास अपायकारक असणारा नायलॉन मांजा वापरू नये, पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

त्याचप्रमाणे पतंग उडवताना नायलॉन मांजा आढळून येणाऱ्यास देखील कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिला आहे. (nylon manja found action will taken against kite flyer Awareness of students in schools by Vavi Police Nashik)

नायलॉन मांजा मुळे पशु पक्षांना इजा होते. त्याबरोबरच माणसांना देखील जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागते. याबाबतच्या घटना आपल्या परिसरात या अगोदर घडल्या आहेत.

त्यामुळे पतंग उडवण्याचा आनंद साजरा करताना इतरांच्या जीवाला नुकसान पोहोचणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. नायलॉन मांजा विक्री करणे व बाळगणे यावर कायद्याने बंदी आहे.

वावी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या गावांमध्ये पतंग विक्रेत्यांकडे अचानक तपासण्या करण्यात येत आहेत. या कारवाईदरम्यान कुणाकडे नायलॉन मांजा आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

त्याचप्रमाणे पतंग उडवणाऱ्या लहान मुले व मोठ्या माणसांवर देखील पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे नायलॉन मांजा वापर करताना प्रत्येकाने सामाजिक भान जपावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री लोखंडे यांनी केले आहे.

nylon manja found action will taken against kite flyer Awareness of students in schools by Vavi Police
Nashik News : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू; पोलीस आयुक्तांकडून अधिसूचना जारी

गेल्या आठवड्यात रायझिंग डेनिमित्त विविध शाळांमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत देखिल आवाहन केले. पतंग उडवताना नायलॉन मांजा झाडांच्या फांद्यांमध्ये, विजवाहक तारांना अडकून राहतो.

त्यामुळे पक्षांना हानी पोहोचते. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांसह सामान्य नागरिकांना आणि प्राण्यांना देखील नायलॉन मांजामुळे जीवघेणी दुखापत होऊ शकते.

त्यामुळे प्रत्येकाने याबाबतीत सजग राहून नायलॉन मांजाचा वापर टाळावा. पतंग उडवण्यासाठी साधा दोरा वापरावा याकडे श्री. लोखंडे यांनी लक्ष वेधले.

...तर पालकांवर कारवाई

"पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरणारी मुले अल्पवयीन असतील तर त्यांच्या पालकांना कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. पक्षीमित्र, प्राणीमित्र यांनी नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करणारा यांच्या बाबत पोलिसांना सूचना द्यावी."- चेतन लोखंडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक

nylon manja found action will taken against kite flyer Awareness of students in schools by Vavi Police
ठाकरे गटाचे १४ आमदारही पात्र, पण 'पक्ष' गेला...; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com