नाशिक : नायलॉन मांजा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ

Nylon manja harmful for birds
Nylon manja harmful for birdsesakal

नाशिक : वेळ दुपारची. स्थळ नाशिकमदील पंडित कॉलनीतील निलगिरीचे झाड. पक्ष्याचा ओरडण्याचा मोठा आवाज येतो. रहिवाशांना नायलॉन मांज्यात (Nylon manja) अडकलेली घार दिसते. पक्षीमित्रांच्या मदतीने तिला जीवदान दिले जाते. दुसऱ्या प्रसंगात अशोक स्तंभ परिसरातून एक महिला दुचाकीवरून घरी निघाली होती. पतंगाच्या मांजामुळे तिचा गळा कापला जातो आणि ती महिला रस्त्यावर कोसळते. दवाखान्यात ताबडतोब उपचाराला नेल्याने तिचे प्राण वाचले. मांजामुळे दुचाकीस्वारांना शहराच्या विविध भागातून जीव मुठीत घेऊन जावा लागत असताना, नायलॉन मांजा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरू लागला आहे.

मागच्या दाराने नायलॉन मांजाची विक्री

एका संस्थेच्या पाहणीत वर्षभरात मांजामुळे २४ पक्ष्यांना प्राण गमवावे लागले, तर ३८ पक्षी जायबंदी झालेत. त्यात पोपट, चिमणी, साळुंकी, कावळे, कबतूर, दयाळ, बुलबूल आदींचा समावेश आहे. रात्री भरारी घेणारे ३० गव्हाणी घुबड जखमी झाले. घार, कापशी घार, बगळे, पाँड हेरॉन, शराटी आदी मांजामुळे जखमी झाल्याचे आढळून आले आहे. नायलॉन मांजा विक्रीवर न्यायालयाची बंदी असली, तरीही छाप्याचा देखावा केला जात असल्याची बाब शहरवासीयांच्या नजरेतून सुटू शकलेली नाही. मागच्या दाराने नायलॉन मांजा विकला जात आहे.

Nylon manja harmful for birds
नाशिक : निवृत्त बँक अधिकाऱ्याला भामट्याने लावला चुना

मकरसंक्रांतीला ‘तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला’, असे म्हटले जात असले, तरीही माणसाच्या विचित्र वागण्यामुळे पक्ष्यांशी असलेला घट्ट स्नेह ढीला होत चालला आहे. उत्सवी वातावरणात काचेची धार लावलेल्या मांजामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. त्यातून कायमस्वरूपी अपंगत्वाचा गंभीर प्रश्‍न आ-वासून उभा ठाकला आहे. त्यामुळे महापालिका झाडावरील नायलॉन मांजा काढण्याची मोहीम राबवत असताना, पतंगोत्सवाचा आनंद खुल्या मैदानात घ्यायला हवा, अशी अपेक्षा पक्षीप्रेमींची आहे.


''गेल्या दोन महिन्यांपासून अनेक पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी झाले आहेत. नायलॉन मांजावर बंदी असताना, हा मांजा शहरात विक्रीसाठी येतो कुठून, हा प्रश्न आहे. जखमी पक्षी आढळ्यास शहरवासीयांनी वन विभाग अथवा पक्षीमित्रांशी संपर्क साधावा.'' - मनोज वाघमारे, पक्षीमित्र

Nylon manja harmful for birds
...म्हणून गिरीशभाऊंनी बुधवारपेठेत जावे - खडसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com